लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीने दुमदुमले चांदूर रेल्वे:एकोप्याचे दर्शन, शोभायात्रेत समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग, ढोल-ताशे, बँजोचा दणदणाट
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त चांदूर रेल्वे शहरात शनिवारी उत्साह, जल्लोष आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले. मिलिंद नगर येथून निघालेल्या शोभायात्रेत समाजबांधवांसह महिला, युवक-युवती आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग नों . प्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर निघालेल्या शोभायात्रेचे शहरातील विविध ठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले….