![]()
पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन करताच राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने उपाययोजनांचे परिपत्रक काढले. इलेक्ट्रिक वाहनांची चार्जिंग यंत्रणा सक्षम करण्याचे निर्देशही दिले. असे असले तरी, शहरात एन कॅपच्या 7.50 कोटी खर्चून 21 ईव्ही चार्जिंग स्टेशन्स धुळखात पडून आहेत. 17 पैकी केवळ 4 चार्जिंग पॉइंटवर अल्पशी समाधानकारक आकडेवारी दिसते. उरलेले सर्वच पॉइंटचा विविध कारणांनी उपयोगच होत नसल्याचे चित्र आहे. सर्व चार्जिंग स्टेशनचा तत्काळ घेणार आढावा चार्जिंग स्टेशनच्या ॲपबाबत इंटरनेटची, स्टेशन परिसरात अतिक्रमण थाटल्याने काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. याबाबत तातडीने ते चार्जिंग स्टेशन सुरु करण्याची व त्या परिसरातील अतिक्रमण हटविण्याचा सूचना देण्यात आलेल्या आहेत. – अविनाश धनाईत, अधीक्षक अभियंता, मनपा
एप्रिलमधील चार्जिंग स्टेशनची स्थिती अशी राजीव गांधी भवन – 77 वेळा
प्रमोद महाजन गार्डन – 40 वेळा
काळेनगर – 32 वेळा
महात्मानगर – 26 वेळा
गोविंद नगर जॅगिंग ट्रॅक-23 वेळा
सातपूर विभागीय कार्यालय-13 वेळा
बिटको चौक-10 वेळा, कृषीनगर- 10 वेळा
अमृतधाम फायर स्टेशन- 9 वेळा
शिवनगर पंचवटी- 8 वेळा
कालिदास कलामंदिर पार्किंग- 5 वेळा
विभागीय कार्यालय, नाशिकरोड- 5 वेळा
बिटको हॉस्पिटल – 4 वेळा
अंबड – सातपूर लिंकरोड- 4 वेळा
विभागीय कार्यालय, सिडको – 3 वेळा
गणेशवाडी, पंचवटी – 1 वेळा
गाडेकर मळा जोगिंग ट्रॅक-1 वेळा
Source link