![]()
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “एक पेड माँ के नाम” या प्रेरणादायी संकल्पनेला व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हरित महाराष्ट्र संकल्पनेला पुढे नेत ना. गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त येथे १००० वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला असून चांदवड शहर
.
उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. १७) येथे या उपक्रमास सुरुवात करण्यात आली असून, पुढील आठ ते दहा दिवसांत संपूर्ण चांदवड शहरात वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी आयोजकांनी दिली. “एक पेड माँ के नाम… एक पेड चांदवड के नाम…’ या संदेशातून हरित आणि पर्यावरणपूरक चांदवड घडविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. शहर अधिक सुंदर, स्वच्छ आणि हिरवेगार करण्याच्या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या मोहिमेसाठी शहरातील विविध प्रभागांतील नगरसेवकांकडे प्रत्येकी ५० रोपे उपलब्ध करून देण्यात आली. तसेच लागवडीसाठी यंत्राच्या माध्यमातून खड्ड्यांची व्यवस्था करण्यात आली. वृक्षांना खत व पाण्याची सोय चांदवड नगरपरिषदेच्या वतीने करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागांतर्गत तयार करण्यात आलेले सेंद्रिय खत वृक्ष लागवडीसाठी वापरण्यात आले. अधिकारी व कर्मचारी वर्गानेही या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून लागवड केलेल्या वृक्षांची देखभाल आणि संवर्धनासाठी नगर परिषदेकडून पुढाकार घेण्यात आला आहे. केवळ वृक्ष लागवड करून थांबायचे नाही, तर त्यांच्या जतन व संवर्धनाचाही निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी नगरसेवक महेंद्र गांधीमुथा, संभाजी गुंजाळ, प्रसाद सोनवणे, संतोष भालेराव, प्रसाद प्रजापत, आकाश बडोदे, किरण वाघ, रामभाऊ जाधव, मनोहर मोरे, सुनील मोरे, मनोज बांगरे, नितीन अग्रवाल, मुख्याधिकारी दिनेश सिनारे, बांधकाम अभियंता भालचंद्र क्षीरसागर, स्वच्छता अधिकारी विजय सोनवणे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. स्वयंसेवी संस्था, महिला बचत गटांचा पुढाकार या उपक्रमास स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, युवक, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांनी प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. “एक वृक्ष लावूया… एक भविष्य घडवूया” या संदेशातून पर्यावरण संरक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेश यावेळी देण्यात आला.