![]()
करमाळा आगामी खरीप हंगामाच्या अनुषंगाने करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची मशागत, खोल नांगरणी आणि बांध-बंदिस्ती दुरुस्तीसह मशागतीची कामे वेगाने सुरू केली आहेत. शेतकरी पावसाळ्यापूर्वी ही कामे उरकून खरिपाच्या पूर्वतयारीला लागला
.
तालुक्यात रब्बी हंगामातील ज्वारीसह मका आदी पिकांची काढणी आणि मोडणीची कामे झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता संपूर्णपणे खरीप हंगामाचे वेध लागले आहेत. शेतकऱ्यांकडून सध्या शेतजमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी शेतात खोल नांगरणी करण्यावर मोठा भर दिला जात आहे. यामुळे जमिनीतील वहनता कमी होऊन पावसाचे पाणी अधिक प्रमाणात साचून राहण्यास मदत होते.
या निर्णयाबरोबरच तण नियंत्रणालाही मोठी मदत होते. त्यामुळे बहुतांशी शेतकरी ट्रॅक्टर यांत्रिकीच्या साहाय्याने नांगरणीसह मशागतीच्या कामांना प्राधान्य देत आहेत. याशिवाय, शेताच्या मशागतीच्या कामाबरोबरच शेताच्या बांध-बंदिस्तीवरही अधिक भर दिला जात जात आहे. उन्हाळ्यात मशागतीची कामे पूर्ण केल्यामुळे पावसाळ्यात पाण्याचे व्यवस्थापन सुलभ होते. शेतकरी बांधवांकडून शेणखत साठवणूक आणि कंपोस्ट खत तयार करण्याची कामेही वेगाने सुरू आहेत.
मशागत महागली ^. ट्रॅक्टरने एक एकर नांगरणीचा दर सुमारे ३५०० रुपये आहे, तर बैलजोडीने एक एकर नांगरणीचा दर ४५०० रुपये इतका प्रचंड असल्याचे शेतकरी सांगत आहेत. शितलकुमार मोटे, शेतकरी
५२ ५९१ हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणीचे नियोजन
पीक क्षेत्र (हे.) २०२५-२६ २०२६-२७ टक्केवारी मका ३९०२.४० १३,७६८ १५,२६५ ८.६२ तूर ५६७५.८० १३,१०२ १५,२६८ ८.५८ उडीद ५०२९.२० २३,६६८ २१,४९० १०.९९ मूग १६३८.२० २६३ २७८ ५ बाजरी २४२९.६० ३२० २९० ९.५० Share with facebook ^यंदा करमाळा तालुका कृषी विभागाकडून खरीप हंगामाचे सुमारे ५२ हजार ५९१ हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. आगामी खरीप हंगाम प्रस्तावित पीक पेरणी क्षेत्राचे नियोजन कृषी विभागाने पूर्ण केले . राजेंद्र नेटके, तालुका कृषी अधिकारी