Headlines

शंकर नगरात गजानन महाराज विजयग्रंथ महापारायण सोहळा:पादुका दर्शन सोहळा, महाप्रसादालाही अनेकांची उपस्थिती‎




गंगा सावित्री निवासस्थान शंकर नगर येथे संत गजानन महाराज विजयग्रंथ महापारायण व पादुका दर्शन सोहळयामध्ये शेकडो महिला व गजानन भक्तांनी २१ अध्याय वाचून श्री संत गजानन महाराजांचा आशीर्वाद घेतला. याप्रसंगी शेकडो भाविकांनी पादुकांचे दर्शन घेत महाप्रसादाचाही लाभ घेतला. अत्यंत भक्तिमय वातावरणात व उत्साहात हा सोहळा झाला. यावेळी संपूर्ण परिसर भक्तिरसाने ओतप्रोत भरून गेला होता. भाजप नेत्या माजी खा.नवनीत राणा यांनीही शेकडो महिला भक्तांसोबत २१ अध्यायांचे वाचन केले. सुनील राणा व अनुपमा राणा मित्र परीवाराद्वारे या पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यासोहळ्यास आ. रवी राणा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व शेकडो भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरली ती अवघ्या ११ वर्षांची सुप्रसिद्ध विजयग्रंथ वाचक साक्षी सुनील ढगे. तिच्या सुमधूर व प्रभावी वाणीतून झालेल्या विजयग्रंथ पारायणाने उपस्थित भक्त मंत्रमुग्ध झाले. या धार्मिक सोहळ्याचे आयोजन गंगाधर राणा व सावित्री गंगाधर राणा यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील राणा, मित्र परिवार तसेच अनेक सेवाभावी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या भव्य धार्मिक सोहळ्यामुळे शंकर नगर परिसरात दिवसभर भक्ती, श्रद्धा व अध्यात्माचे वातावरण निर्माण झाले होते. हजारो भाविकांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा अमरावतीतील एक संस्मरणीय धार्मिक कार्यक्रम ठरला. यावेळी ह.भ.प.प्रमोद कराडे महाराज, गंगाधर राणा, सावित्री राणा, निळकंठ कात्रे, मीरा कात्रे, सुनील राणा, अनुपमा राणा, आ.रवी राणा, माजी खा. नवनीत राणा, डोलेंद्र पाटील, अंजू पाटील, प्रेमजीत पटले, जतीन राणा, आर्यन राणा, आरोही राणा, रणवीर राणा व परिसरातील अनेक भाविक उपस्थित होते. मोताळ्याहून आल्या महाराजांच्या पादुका या प्रसंगी जयपूर (मोताळा), जि. बुलढाणा येथील देशमुख परिवाराकडे जतन करण्यात आलेल्या आणि श्री गजानन महाराजांनी प्रत्यक्ष वापरलेल्या पवित्र पादुकांचे दर्शन प्रथमच अमरावतीकर भक्तांना घेता आले. पादुका दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दर्शनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात, शिस्तबद्ध पद्धतीने आणि उत्साहात पार पडला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *