Headlines

आयुक्त गुंडे यांच्या हस्ते गणवेश, पुस्तकांचे वाटप‎:शिक्षण विभागाच्या स्वागत कार्यक्रमाने विद्यार्थ्यांसह पालकही भारावले




शाळा प्रवेशाच्या पहिल्या दिवशी कॅम्प परिसर स्थित जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळेत (गर्ल्स हायस्कुल) विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्या हस्ते विद्यार्थीनींना मोफत पुस्तके व गणवेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रिया देशमुख, म.रा. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष संदीप संगवे, गटशिक्षणाधिकारी संदीप बोडके, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती वृंदावनाताई बोरकर, मुख्याध्यापक बालकृष्ण आंधळे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत विद्यार्थिनींना आवश्यक शैक्षणिक साहित्य वेळेत उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. नवीन पाठ्यपुस्तके व गणवेश प्राप्त झाल्याने विद्यार्थिनींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणारी विद्यार्थिनी एकता हिवे हिचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आजच्या दिवशी ज्यांचा वाढदिवस आहे, अशा विद्यार्थिनींचेही विशेष अभिनंदन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे संचालन विरेंद्र ब्राह्मण यांनी केले. आभार शिक्षक सुरेंद्र मेटे यांनी मानले. सीईओ सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत जि.प. उच्च प्राथमिक शाळा, ब्राह्मणवाडा येथे प्रवेशोत्सव पार पडला. यावेळी सीईओंनी स्वत: बैलगाडीवर सजवलेल्या रथाचे सारथ्य करत नवीन विद्यार्थ्यांना शाळेत आणले. या वेळी ग्रामपंचायत प्रशासक स्नेहल भूयार, केंद्रप्रमुख कैलास पुनसे, कमलेश चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रेमकुमार बागडे, उपाध्यक्ष प्रशांत धोत्रे, समिती सदस्य, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सीईओंची बैलगाडी स्वारी; पुलावचा आस्वादही घेतला



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *