Headlines

गोळेगावात रस्त्याचा वाद सामोपचाराने मिटला:रस्ता मोकळा; कौटुंबिक नाते जपण्याचे आवाहन‎




गंगापूर तालुक्यातील गोळेगाव शिवारातील गट क्रमांक ८१ मधील शेतरस्त्याच्या वादावर अखेर सामोपचाराने तोडगा निघाला. नायब तहसीलदार सचिन वाघमारे यांच्या मध्यस्थीने काका-पुतण्यामधील अनेक वर्षांपासून सुरू असलेला वाद मिटवून ८ फूट रुंदीचा शेतरस्ता मोकळा करण्यात आला. हरून शेख, शब्बीर शेख, मुसा शेख आणि बशीर शेख यांच्या वडिलोपार्जित २८ एकर शेतजमिनीतील रस्त्याच्या प्रश्नावर अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. या प्रकरणाची सुनावणी गंगापूर तहसील कार्यालयातही सुरू होती. तहसीलदारांच्या निर्देशानुसार मंगळवारी नायब तहसीलदार सचिन वाघमारे यांनी सिद्धनाथ वाडगाव मंडळ अधिकारी अनिता मुथा, ग्राम महसूल अधिकारी सुनील सरगर, योगेश्वरी चिंतामणी व चैताली सोनवणे सिद्धनाथ वाडगाव यांच्यासह घटनास्थळी भेट दिली. या वेळी वादी व प्रतिवादी यांच्याशी सविस्तर चर्चा करत शेतरस्त्याच्या वादामुळे वडिलोपार्जित कौटुंबिक व पारिवारिक नातेसंबंध पिढ्यान््पिढ्या बिघडू नयेत अशी भावनिक साद नायब तहसीलदार वाघमारे यांनी घातली. गावकरी व उपस्थित पाहुण्यांच्या सहमतीने दोन्ही पक्षांनी सामोपचाराने वाद मिटवण्यास सहमती दर्शवली. त्यानंतर ८ फूट रुंदीचा शेतरस्ता मोकळा करून पंचनामा करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार सचिन वाघमारे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून बांध व शेतरस्त्याचे वाद न्यायालयात न नेता परस्पर समजुतीने सोडवावेत. गरज भासल्यास महसूल प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *