Headlines

कासमपुरा येथे मोबाइलच्या अतिवापरावर संवाद:पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनतर्फे शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसह विविध विषयांवर मार्गदर्शन‎



लोहारा परिसरातील कासमपुरा येथील राम सीता शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पाचोरा विभागाचे पोलीस उपअधिक्षक बापू रोहम आणि पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी भेट दिली. या प्रसंगी त्या

.

कार्यक्रमाला पोलीस पाटील मंगलाबाई परदेशी आणि माजी सरपंच नितीन परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक किरण चौधरी, शिक्षक आनंदा ढोणी, सीमा पाटील आणि भालेराव यांच्या हस्ते उपस्थितांचे पुष्पगुच्छ व शाल-श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी बोलताना पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलच्या दुष्परिणामांपासून दूर राहण्याचे आणि सायबर सुरक्षेचे नियम पाळण्याचे आवाहन केले. तसेच, व्यसनाधीनतेपासून दूर राहून शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी दैनंदिन व्यायाम करण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल परदेशी यांनी तर आभारप्रदर्शन आढाव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *