Headlines

मंगेश साबळे यांच्या तडीपारीच्या नोटिसीविरोधात ग्रामस्थ आक्रमक:वडोदबाजार पोलिसांना दिले निवेदन; शेकडो ग्रामस्थांची एकमुखी मागणी ‎



छत्रपती संभाजीनगरातील सिटी चौक पोलिस ठाण्याकडून फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश संजय साबळे यांना जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, या कारवाईविरोधात गेवराई पायगा येथील गावकऱ्

.

निवेदनात म्हटले आहे की, या कारवाईसाठी घेण्यात आलेल्या दोन गुप्त साक्षीदारांचे जबाब पूर्णपणे खोटे असून त्यांची नावे जाहीर करून त्यांनी दिलेले जबाब हे बनावट व राजकीय द्वेषापोटी दिलेले आहेत. हे जबाब चारित्र्यहनन करणारे असून गावातील शांतता व सुव्यवस्थेला गालबोट लावणारे आहेत. गावात यापूर्वी असा कोणताही प्रकार घडलेला नसून सरपंचांवरील ही कारवाई चुकीच्या माहितीच्या आधारे करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. राजकीय षड््यंत्रातून दाखल केलेले खोटे साक्षीदार समोर आणण्यात यावेत आणि त्यांची नावे जाहीर करण्यात यावीत, अशी मागणी गावकऱ्यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *