Headlines

Prithviraj Chavan Slams BJP & RSS Over Paper Leak In Nashik


काँग्रेसने महिला आरक्षण विधेयकाला कधीही विरोध केलेला नाही, उलट काँग्रेसच महिला आरक्षणाची खरी जनक आहे, असा जोरदार पलटवार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. नाशिकमध्ये काँग्रेसच्या 10 दिवसीय प्रश

.

महिला आरक्षणाचे जनक आम्हीच, संघाला थेट आव्हान

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप महिला मोर्चाने केलेल्या आंदोलनावर प्रत्युत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, काँग्रेसने कधीही विरोध केला नाही: “काँग्रेसचा महिला आरक्षणाला विरोध आहे, हे कोणत्या मूर्खाने सांगितले? २०२३ मध्ये जेव्हा केंद्र सरकारने घटनादुरुस्ती विधेयक आणले, तेव्हा काँग्रेसने त्याला पूर्ण पाठिंबा दिला होता. महिला आरक्षणाचे मूळ जनक आम्हीच आहोत.”

“भाजपला महिला आरक्षण लागू करायचे नसून केवळ उत्तर-दक्षिण वाद निर्माण करायचा आहे आणि जनगणनेच्या नावाखाली टोलवाटोलवी करायची आहे. महिलांच्या अधिकारांवर बोलणाऱ्यांनी आधी सांगावे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (RSS) एखाद्या महिलेला प्रवेश मिळतो का? संघात एखादी महिला कधी ‘सरसंघचालक’ होऊ शकते का? मनुस्मृती मानणाऱ्यांनी आम्हाला महिलांचे हक्क शिकवू नयेत.”

प्रत्येक पेपरफुटीमागे भाजपच्या बड्या नेत्यांचा हात

एमपीएससी (MPSC) औषध निरीक्षक परीक्षेतील गैरप्रकार आणि राज्यातील सातत्यपूर्ण पेपरफुटीवर चव्हाण यांनी तीव्र संताप व्यक्त केला. दोन-दोन कोटींना पेपर विक्री: “कॉलेज प्रवेश असो वा सरकारी नोकऱ्या, राज्यात प्रत्येक पेपर फुटत आहे. या पेपरफुटीच्या गोरखधंद्याला भाजपचे ज्येष्ठ नेते जबाबदार आहेत. पेपरफुटीमध्ये कोणतीही मोठी जोखीम राहिलेली नाही; कारण कोणालाही कडक शिक्षा होत नाही, मात्र बक्षीस प्रचंड मिळते. दोन-दोन कोटी रुपयांना एक-एक पेपर विकला जात आहे.”

“भाजपच्या कार्यकाळात 150 हून अधिक परीक्षांचे पेपर फुटले, पण एकाही मोठ्या सूत्रधाराला शिक्षा झालेली नाही. गरीब विद्यार्थ्यांचे हे शोषण आम्ही खपवून घेणार नाही. सरकारने या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढून संबंधितांना कठोर शिक्षा केली पाहिजे.”

कुंभमेळा आणि शक्तिपीठ महामार्गात 40 टक्के कमिशनचा आरोप

नाशिकच्या पायाभूत सुविधा आणि विकासकामांवर बोलताना त्यांनी सरकारवर थेट भ्रष्टाचाराचे ताशेरे ओढले. कुंभमेळ्याचा डीपीआर नाही: “नाशिक खड्ड्यांचे शहर झाले आहे. नाशिक कुंभमेळ्याचा कोणताही सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) अद्याप तयार नाही. स्थानिकांना आणि जनतेला विश्वासात न घेता केवळ ठराविक ठेकेदारांना खिरापत वाटण्याचे काम सुरू आहे. कुंभमेळ्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे.”

“1 लाख कोटी रुपयांचा शक्तिपीठ महामार्ग हा केवळ 40 टक्के कमिशन लाटण्यासाठी रेटला जात आहे. शेतकरी या प्रकल्पाला कडाडून विरोध करत आहेत आणि आगामी निवडणुकीत काँग्रेस हा भ्रष्टाचाराचा मुद्दा जनतेच्या न्यायालयात मांडणार आहे.”

राहुल गांधींकडून राज्यातील समस्यांचा आढावा

काँग्रेसच्या नवनिर्वाचित 70 ते 80 जिल्हाध्यक्षांच्या 10 दिवसीय निवासी शिबिराच्या समारोपासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी नाशिकमध्ये दाखल झाले. शिबिरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांच्या रोज होणाऱ्या आत्महत्या, शक्तिपीठ महामार्गाचा वाद, नाशिक कुंभमेळ्यातील आर्थिक गैरव्यवहार, मतदार याद्यांमधून वगळण्यात आलेली नावे आणि आदिवासी आश्रमशाळांमधील समस्यांवर सविस्तर चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, नाशिक कुंभमेळ्यातील निधीचा अपव्यय आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा राहुल गांधी संसदेत तसेच राष्ट्रीय पातळीवर आक्रमकपणे मांडणार आहेत.

हेही वाचा…

राहुल गांधी नाशिकमध्ये दाखल, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन: काँग्रेसच्या शिबिरात ‘कुंग-फू’ प्रात्यक्षिके दाखवणार, आदिवासी विद्यार्थ्यांशी साधणार संवाद

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी नाशिक दौऱ्यावर आले असून काँग्रेसच्या ‘सृजन शिबिरा’चा समारोप त्यांच्या उपस्थितीत राहणार आहेत. गंगापूर धरण परिसरातील शिबिरात ते 75 जिल्हाध्यक्षांसमोर ट्रेनर रिषभ यांच्यासोबत ‘कुंग-फू’चे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून राहुल गांधी यांच्याविरोधात निषेध केला आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.