![]()
प्रख्यात लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेने जालना जिल्ह्यात ८ हजार कोटींच्या गुंतवणुकीची तयारी दर्शवली आहे. जिल्हा प्रशासन, ‘जालना फर्स्ट’ आणि विकास ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने जालना शहरात गुरुवारी प्रथमच आयोजित ‘इंडस्ट्रियल समीट २०२६-द समीट टू ग्रोथ’मध्ये विकासाचा व्यापक आराखडा मांडण्यात आला. यावेळी लॉयड्स मेटल्सने नजीकच्या काळात २ हजार कोटी व दीर्घकालीन टप्प्यात आणखी ६ हजार कोटी अशी एकूण ८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली. या परिषदेत ४५० उद्योजकांनी सहभाग घेतला. याप्रसंगी स्टील, सीडस्, सिल्कच्या पुढे जावून वायनरी उद्योगाला संधी असल्याचेही नमूद करण्यात आले. एमआयडीसी सीईओची घोषणा
जिल्हा प्रशासन, ‘जालना फर्स्ट’ आणि विकास ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने जालना शहरात गुरुवारी प्रथमच आयोजित ‘इंडस्ट्रियल समिट २०२६-द समीट टू ग्रोथ’मध्ये विकासाचा व्यापक आराखडा मांडण्यात आला. या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून जेएनपीटीचे अध्यक्ष गौरव दयाल, एमआयडीसीचे सीईओ दीपेंद्र सिंह कुशवाह, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, महिकोचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र बारवाले, जेएनपीटीचे संचालक राम भोगले, एलजी बालकृष्णन् अँड ब्रास लि.चे व्यवस्थापकीय संचालक पी. प्रभाकरन यांच्यासह ४५० हून अधिक उद्योजक, गुंतवणूकदार, उद्योग व वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) २० टक्के आरक्षण व पायाभूत सुविधांयुक्त भूखंड उपलब्ध करून देण्याची ग्वाही कुशवाह यांनी दिली. यावेळी ड्रायपोर्ट ते शेंद्रा-बिडकीन रस्ता, शटल रेल्वे, नवीन एमआयडीसीसाठी जमीन संपादन व सिडको प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी जालना फर्स्टचे अध्यक्ष गोविंद गोयल यांनी केली. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने विनोदराय इंजिनिअरिंग आणि रूट पाइप्ससोबत गॅस पुरवठ्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. तर एंड्युरन्स आणि बजाजने स्थानिक पुरवठादार विकसित करण्याबाबत स्वारस्य दाखविले. या वेळी स्टील, सीडस्, सिल्कच्या पुढे जावून वायनरी उद्योगाला संधी असल्याचेही या वेळी नमूद करण्यात आले.” प्रारंभी वृक्षपूजन करण्यात आले. सुनील रायठठ्ठा, माजी अध्यक्ष,सीएमआयए कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे, आता पुढे काय होणार ? आता हा अहवाल एमआयडीसीकडे दिला जाईल. जालन्यात उद्योग येण्यास तयार आहेत, पण जागा नाही. त्यामुळे लवकर भुसंपादन करुन विकसीत भुखंड देण्याचा दबाव एमाआयडीसीवर आणला जाईल. यासाठी किती कालावधी लागेल? पुढील सहा महिन्यात या समिटचे परिणाम दिसू लागतील. तर संपूर्ण प्रक्रिया वेग घ्यायला आणखी थोडी प्रतिक्षा करावी लागेल. इंडियन ऑईलचा प्रकल्प नेमका काय आहे? त्यांची गॅस पाइपलाइन समृद्धी महामार्गाला समांतर जाते आहे. त्यांना प्रत्येक औद्योगिक क्षेत्रात गॅस कनेक्शन द्यायचे आहेत. त्यामुळे विनोदराय इंजिनीअर्सने त्यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे. स्वारस्य दाखवलेल्या कंपन्यांच्या गुंतवणूकीतून किती रोजगार निर्मिती होईल? फक्त याच कंपन्यांचा विचार न करता ड्रायपोर्ट सुरु झाला आहे. आता गुंतवणुकीसाठी योग्य जागा व योग्य वेळ हीच आहे. इतरही उद्योग येतील व पुढील दोन वर्षात किमान एक लाख नवे रोजगार िनर्माण होतील.
Source link
इंडस्ट्रियल समिट 2026:जालन्यात लॉयड्स मेटल्सची 8 हजार कोटी गुंतवणुकीची तयारी, उद्याेग समिटमध्ये घाेषणा