Headlines

शिक्षक दिन विशेष‎:गावचा कायापालट अन् एकल महिलांचे अश्रू पुसणारा शिक्षकाचा हात




शाळेच्या चार भिंतींत केवळ अक्षरओळख होत नसते, तर तिथे एका संवेदनशील मनाची आणि पर्यायाने उद्याच्या सजग समाजाची पायाभरणी होत असते. शिक्षकाने दिलेली एक छोटीशी ठिणगी पुढे जाऊन समाज परिवर्तनाचा वणवा किंवा विकासक्रांतीची मशाल कशी बनू शकते. याचे उदाहरण शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी आणि पद्मश्री पोपटराव पवार यांचे कार्य आहे. शिक्षक हा केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणारा घटक नसून, तो पिढ्या घडवणारा आणि समाजाचा विवेक जागवणारा खरा शिल्पकार असतो. हेरंब कुलकर्णी यांच्यातील संवेदनशील सामाजिक जाणीव आणि पोपटराव पवारांचे ग्रामविकासाचे स्वप्न या दोन्ही महावृक्षांची बीजे त्या त्या काळातील शिक्षकांनीच पेरली होती. ज्यावेळी चौथीपर्यंत गावात शिकलो, त्यावेळी शिक्षक गावातील वाद, तंटे, आध्यात्मिक कार्यक्रम, लग्नसोहळे, नाट्याचे सादरीकरण अशा सर्व कामांत आणि कार्यक्रमांत सहभागी असायचे. तेव्हा शिक्षकांचे नैतिक अधिष्ठान गावात होते. निसर्ग, राष्ट्रप्रेम, गावाविषयीचे प्रेम हे शाळेतून शिकायला मिळाले. प्राथमिक शाळा हाच राष्ट्र व समाजाला जोडणारा दुवा आहे. दर दहा वर्षांनी नवी पिढी समजदार होत असते, ती पुन्हा विकासक्षेत्रात सक्रिय ठेवायची आहे. त्यामुळे आजही आम्ही गावाचा ताळेबंद मांडतो, व्यसनमुक्तीवर काम करतो. माझं गाव हीच माझी खरी प्रेरणा. त्यावेळी कांबळे गुरुजी, सोनवणे गुरुजी होते. गावामध्ये तीन गुरुजी—विठोबा ठाणगे, वनाजी ठाणगे व मार्तंड ठाणगे गुरुजी होते. हे गावातील सांस्कृतिक उपक्रमांत पुढे असायचे, त्यांचे मार्गदर्शन असायचे. आजही ९२ वर्षे वय झालेले हरिभाऊ ठाणगे गुरुजी निवृत्तीनंतरही गावातील सगळे हिशेब पाहतात. त्यांनी दिलेले नैतिक मूल्यांचे धडे नेहमीच प्रेरणादायी राहिले आहेत. पद्मश्री पोपटराव पवार. मला अकोले जि.प. शाळेत असतानाचे शिक्षक आठवतात, त्यावेळी पवार व देशमुख सर होते. जुन्या पिढीतले शिक्षक धोतर घालायचे. १९७८ च्या दरम्यान, त्या शिक्षकांनी महात्मा गांधींची पुण्यतिथी सायंकाळी साजरी केली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, महात्मा गांधींची हत्या याच वेळी झाली होती. त्यावेळी गांधीजींची भजने मुलांकडून म्हणून घेतली. तेव्हा महात्मा गांधी आम्हाला “क्लिक’ झाले. पुढे कॉलेजला असतानाही शिक्षकांचे स्थान महत्त्वपूर्ण राहिले. प्राध्यापकांशी होणारी चर्चा, एनएसएसचा झालेला परिणाम यातून सामाजिक चळवळीची पार्श्वभूमी तयार होत गेली. बानकर सर, व्ही. व्ही. देशमुख, रासने यांच्या सान्निध्यात वाचन खूप वाढले. मी शिक्षक झाल्यानंतर वाचन चळवळ रुजवण्यासाठी प्रयत्न केले. वाचनातूनच समजले की, गरिबांसाठी काम केले पाहिजे. त्यामुळे नोकरी करताना अपराधीपणा वाटायचा; म्हणून स्वेच्छानिवृत्ती घेऊन आता पूर्णवेळ एकल महिलांसाठी काम सुरू आहे. हेरंब कुलकर्णी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक. शिक्षकांच्या संस्कारांनी समाजसेवेची वाट दाखवली



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *