Headlines

परदेशी पाहुण्यांची माहिती उशिरा दिली:पुण्यातील जेडब्ल्यू मेरियट, शेरटन ग्रँड हॉटेलांवर गुन्हा दाखल; 39 दिवसांपर्यंत विलंब




पुण्यातील जेडब्ल्यू मेरियट आणि शेरटन ग्रँड या दोन पंचतारांकित हॉटेलांच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल झाला आहे. हॉटेलमध्ये राहिलेल्या परदेशी नागरिकांची माहिती वेळेत पोलिसांना न दिल्याने ही कारवाई करण्यात आली. पुणे पोलिसांच्या विशेष शाखेने केलेल्या तपासणीत हा प्रकार समोर आला. पोलिस उपायुक्त प्रशांत अमृतकर यांनी शहरातील हॉटेल, लॉज, घरमालक आणि इतर आस्थापनांना त्यांच्याकडे येणाऱ्या परदेशी नागरिकांसह भाडेकरूंची माहिती ठरलेल्या वेळेत पोलिसांना देण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर शहरभर कारवाई सुरू आहे. याच मोहिमेअंतर्गत पंचतारांकित हॉटेलांच्या नोंदी तपासण्यात आल्या. सेनापती बापट रस्त्यावरील जेडब्ल्यू मेरियट हॉटेलमध्ये इटलीचे नागरिक ख्रिश्चन हुबेर ७ जून २०२६ रोजी राहायला आले होते. मात्र, त्यांच्या आल्याची माहिती हॉटेल व्यवस्थापनाने १७ जुलै रोजी पोलिसांना दिली. ही माहिती सुमारे ३९ दिवस ११ तास (९४७ तास) उशिरा नोंदवली गेल्याचे तपासात आढळले. त्याचप्रमाणे, शेरटन ग्रँड हॉटेलमध्ये चीनचे नागरिक क्यू लुओ १४ जून २०२६ रोजी राहायला आले होते. त्यांच्या आल्याची माहिती हॉटेल व्यवस्थापनाने २८ जून रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास नोंदवली. ही माहिती सुमारे १४ दिवस एक तास (३३७ तास) उशिरा दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. परदेशी नागरिकांच्या राहिलेल्यांची माहिती वेळेत देणे सुरक्षेसाठी बंधनकारक आहे. दोन्ही हॉटेल व्यवस्थापनांनी निष्काळजीपणाने नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. पोलिस उपायुक्त अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली चतु:शृंगी आणि बंडगार्डन पोलिस ठाण्यांकडून पुढील तपास सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *