Headlines

वैजापुरातील शिक्षक धर्मांतरप्रकरणी ‎संस्थेच्या 18 शाळांमध्ये तपास होणार‎:संस्थेतील शिक्षक भरतीच्या प्रक्रियेवर पोलिसांना संशय‎, कुणालाही अटक नाही




स्थायी शिक्षकाच्या नोकरीसाठी‎ तालुक्यातील बोरसर येथील शांती सदन‎ शाळेतील शिक्षक दांपत्याचे धर्मांतर ‎करण्यात आल्याचा आरोप शिक्षकाने ‎केला. त्यामुळे या संस्थेच्या 18 शाळा ‎पोलिसांच्या रडारवर आल्या आहेत.‎संबंधित संस्थेच्या‎ अनुदानित-विनाअनुदानित मिळून‎ जिल्ह्यात 18 शाळा आहेत. तेथील ‎शिक्षक भरतीच्या पद्धतीचा पोलिस‎ तपास करत आहेत. बोरसरप्रमाणेच‎ अन्य शाळांमध्ये धर्मांतर झाले आहे‎ किंवा नाही, याचा तपास सुरु आहे.‎ या साखळीची व्याप्ती जिल्ह्याबाहेर‎ अथवा परराज्यापर्यंत आहे का, हा‎ शोधाचा महत्त्वाचा भाग ठरणार आहे.‎पोलिसांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेतले.‎पथकाने शिक्षकाची चौकशी केल्यानंतर‎ शनिवारी सायंकाळी उशिरा पाच‎ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला. मात्र रविवारी ‎उशिरापर्यंत कोणालाही अटक नव्हती.‎ पती-पत्नीच्या नावावरील दोन कागदपत्रांवर‎ 8 सप्टेंबर 2024 अशा तारखा असून, ‘पवित्र‎दृढीकरण साक्रामेंत’ स्वीकारल्याची नोंद ‎दिसते. त्यावर बिशपचा उल्लेख, शिक्का ‎आणि स्वाक्षऱ्याही आहेत. ही प्रमाणपत्रे‎ कोणी जारी केली, हे तपासात समोर येईल.‎ मुद्रांक शिक्षकाने‎ आणला की संस्थेने?‎ फिर्यादीतील आणखी एक‎महत्त्वाचा दुवा म्हणजे स्टॅम्प‎पेपर. कथित धर्मांतरानंतर‎ स्टॅम्पवर स्वतःच्या हाताने ‎मजकूर लिहून घेतल्याचा ‎आरोप शिक्षकाने केला आहे.‎हा बॉण्ड कुणाच्या नावाने‎ खरेदी झाला, त्यावरील‎ स्वाक्षऱ्या नेमक्या कुणाच्या‎ आहेत, हे अस्पष्ट आहे.‎ प्रकार 2024 मध्ये,‎तक्रार दोन वर्षांनी‎ हे प्रकरण 2024 मधील‎ आहे, नोकरी गेल्यानंतर‎ तक्रार झाली. त्यामुळे या‎दोन वर्षांत नेमके काय ‎घडले, पाचही आरोपींच्या‎ चौकशीनंतर पैशांचा प्रवास,‎बॉण्डची पार्श्वभूमी आणि‎ आणखी व्यक्तींचा सहभाग‎ आहे का, याचे धागे समोर‎ येण्याची शक्यता आहे.‎ पुरावे तपासून पुढे कार्यवाही‎ फिर्यादीच्या आरोपांमध्ये किती ‎सत्यता आहे, याचा सर्व बाजूंनी तपास‎ सुरू आहे. अन्य शाळांशी संबंधित‎ आवश्यक बाबी तपासल्या जातील.‎ पुराव्यांनुसार कार्यवाही केली जाईल.‎ प्रदीप भिवसने, एपीआय, वीरगाव ठाणे‎ 18 शाळांतील भरतीचा तपास‎ संस्थेच्या 18 शाळांपैकी किती‎ अनुदानित-विनाअनुदानित, किती मराठी‎ व किती इंग्रजी माध्यमाच्या आहेत, याचा ‎तपशील महत्त्वाचा ठरणार आहे. जुन्या‎ नियुक्त्यांचा माग काढल्यास भरतीत‎ समान ‘पॅटर्न’ होता, हे स्पष्ट होऊ शकते.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *