Headlines

बाप्पांना आज निरोप; 36 कृत्रिम विसर्जन स्थळे सज्ज:अनंत चतुर्दशीला प्रथमेश आणि छत्री तलावासह कृत्रिम तलावावर सुरक्षितपणे करता येणार विसर्जन‎



अनंत चतुर्दशीच्या पर्वावर शहरात शुक्रवारी २५ सप्टेंबरला बाप्पांच्या विसर्जनासाठी ३६ कृत्रिम विसर्जन स्थळे सज्ज झाली. हा सोहळा पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी मनपाने तयारी केली.

.

गर्दी, वाहतूक कोंडी, जलप्रदूषण टाळण्यासाठी मनपाने नागरिकांना घराजवळील परिसरातच गणेशमूर्तींचे विसर्जन करता यावे, यासाठी विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन टँक उपलब्ध करून दिले.नागरिकांनी घरातील श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम विसर्जन टँकमध्येच करावे. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासह शहरातील स्वच्छता मोहिमेलाही हातभार लागेल, असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले.अनंत चतुर्दशीला २५ ला २०३, शनिवारी २६ ला १४७ अशा ३५० सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे दोन दिवसांत पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत विसर्जन होणार आहे. यासाठी पोलिसांद्वारे चोख बंदोबस्त ठेवला आहे. गणेश विसर्जनाची प्रक्रिया सुरळीतपणे व्हावी, यासाठी मनपाने प्रत्येक विसर्जनस्थळी नियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. संबंधित ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था, नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन, स्वच्छता, इतर बाबींची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर सोपवली आहे.

विसर्जनाचे दिवसभरात चार मुहूर्त चतुर्दशी तिथी ची सुरूवात २४ ला रात्री ११.१८ वा. सुरूवात झाली , समाप्ती २५ ला रात्री ११.०६ वा. होईल. यंदा, पंचांगानुसार, २५ ला अनंत चतुर्दशीचा दिवस मानला जातो. याच दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते . पहिला शुभ मुहूर्त : सकाळी ०६.२८ वाजेपासून ते १०.५९ वाजेपर्यंत राहील.दुसरा शुभ मुहुर्त : दु. १२.३० ते २.०१ वाजेपर्यंत, तिसरा शुभ मुहुर्त : सायं. ५.०२ ते ६.३२ पर्यंत व चौथा शुभ मुहुर्त : रात्री ९.३१ पासून ते ११.०१ वाजेपर्यंत राहील गणपती बाप्पाला निरोप देण्यापूर्वी त्यांची पूजा करून नैवेद्य दाखवात. त्यानंतर आरती मग मूर्तीचे विसर्जन केले जाते, अशी माहिती पं. डॉ. संजय शहाकार यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *