Headlines

सरकारी बँका आज सुरू:उद्यापासून कर्मचाऱ्यांचा संप




बँक कर्मचाऱ्यांच्या २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या तीन दिवसांच्या संपामुळे सलग पाच दिवस बँकिंग सेवा विस्कळीत होण्याची भीती होती. मात्र, रविवारी (दि. २७) सर्व सरकारी बँका सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सरकारी बँकांचे कामकाज रविवारी सुरू राहणार आहे. भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, युनियन बँक, इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक आणि युको बँक यासारख्या सरकारी बँकांचे कामकाज सुरू राहणार आहे. केवळ सरकारी बँका सुरू राहणार आहेत. खासगी बँका बंद राहणार आहेत. संप सोमवारपासून सुरू होणार होता. मात्र संप सुरू होण्याआधीचे दोन दिवस महिन्यातील चौथा शनिवार आणि रविवार आहेत. त्यामुळे सलग पाच दिवस बँका बंद राहिल्या गैरसोय होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *