Headlines

विरोधकांनी कारखान्याची बदनामी करू नये- माजी आमदार मुरकुटे:किरकोळ मतभेद वगळता सभा शांततेत; शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व पोलिसांत वाद‎




अशोक सहकारी साखर कारखान्याने कोणत्याही शेतकऱ्याचे पैसे बुडवले नाही, सर्वच कारखाने तोट्यात आहेत. सर्वांचा उत्पादन खर्च वाढला आहे मात्र विरोधक जाणीवपूर्वक अशोकची बदनामी करून ऊस उत्पादकांना बाहेरच्या कारखान्याला ऊस देण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. असे जर गैरसमज निर्माण केले तर कारखाना बंद पडेल आणि कारखाना बंद पडला आपल्याला कोणीही विचारणार नाही. उगाचच कारखान्याची बदनामी होईल असे वक्तव्य केले जात आहे. उसाला भाव देण्याची आपली जबाबदारी आहे. कारभार चुकीचा वाटत असेल तर निवडणुकीत उभे राहा, सभासदांना वाटेल त्याच्या हातात सत्ता देतील. लोकाच्या मनात शंका निर्माण करण्याचे पाप करू नका, असे आवाहन चेअरमन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले. कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुरकुटे बोलत होते. व्हाइस चेअरमन आदिनाथ झुरळे, सुरेश गलांडे, प्रताप भोसले, ॲड. अजित काळे, मंजुश्री मुरकुटे, वंदना मुरकुटे, शेतकरी संघटनेचे जिल्हाधक्ष अनिल औताडे उपस्थित होते. वार्षिक सभेत सभासदांनी आपली मते मांडली. यावेळी अनेकांनी कारभारावर घणाघात करत गणेश आणि अशोकच्या कारभाराची तुलना करून कारभार कसा चुकीचा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. स्वनिधी उभारायला हवा, कामगारांचे ११ महिन्यापासून पगार नाही, तोटा ३९० कोटी झाला आहे. प्रदूषणामुळे अनेकांचे विहिरीचे पाणी खराब झाले आहे. विहिरीत मळीचे पाणी उतरले असून त्यावर उपाययोजना करायला पाहिजे. परवानगी नसताना मळीचे पाणी सोडले जाते असे आरोप केले. माजी आमदार मुरकुटे म्हणाले, कोणाच्याही शेतात मळीचे पाणी गेले नाही. ऊस दर इतर कारखान्याच्या बरोबरीने दिला. कोणाचेही पैसे बुडवले नाही. त्यांनी अशोकसह इतर कारखान्याचे तोटे व कर्जाचे आकडे वाचून दाखवले. शेतकऱ्यांच्या ठेवीतून बाकी कारखान्यांनी ठेवी घेतल्या परंतु अशोकने ठेवी घेतल्या नाही. त्यांनी ठेवी घेऊन प्रकल्प उभे केले आपण ते केले नाही असे सांगितले. दरम्यान, सभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता होती मात्र किरकोळ मतभेद वगळता सभा शांततेत पार पडली. प्रा. कार्लस साठे आणि ज्ञानेश्वर मुरकुटे यांच्यात पुरस्काराच्या मुद्द्यावरून चांगलीच बाचाबाची झाली. दरम्यान, उत्पादन खर्चावर जोपर्यंत भाव मिळत नाही तोपर्यंत साखर विकू नये. गाळप क्षमता वाढवा, ऊसाला भाव द्यावा. पैसे देण्याचे आश्वासन द्या. कोणीही येते आणि ऊस उचलतात, तुम्ही लक्ष घाला. आंदोलन उभे करा आम्ही साथ देऊ. ऊस असताना बाहेरून ऊस का आणावा लागतो. व्यवस्था चुकते आहे त्यावर लक्ष द्यावे लागेल. बाहेर गेलेल्या उसाच्या काटा कोण करणार. पैसे मिळण्यासाठी चकरा माराव्या लागतात त्यामुळे सर्वांनी अशोक कारखान्यालाच ऊस द्यावा असे आवाहन ॲड अजित काळे यांनी केले. पुरावे असतील तर तक्रार द्या सभासद अर्जुन पटारे यांनी पोलिसांनी आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. ओळखपत्र असतानाही पोलिसांनी मारहाण केली असून आपल्याकडे व्हिडिओ असल्याचा दावा केला. त्यावर शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि पोलिसात बाचाबाची झाली. त्यावर सहायक पोलिस निरीक्षक लहाने यांनी जाहीर खुलासा करताना सांगितले असे काही झाले नाही. कोणाकडे पुरावे असतील तर तक्रार द्यावी असे आवाहन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *