![]()
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. जरांगे यांच्या आंदोलनात सक्रिय असलेल्या महिला आंदोलक ललिता तारख यांना सोशल मीडियावर ट्रोल करणे, धमक्या देणे तसेच त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि अश्लील स्वरूपाचे आरोप करून ते व्हायरल केल्याप्रकरणी 10 ते 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ललिता तारख यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात पाच जणांसह अन्य 5 ते 6 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर निर्माण झालेल्या वादातून हे प्रकरण पुढे आले आहे. जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले होते. मागण्यांवर तोडगा निघत नसल्याने त्यांनी मुंबईत जाऊन आंदोलन करण्याची भूमिका घेतली होती. त्यानुसार मुंबईच्या दिशेने जात असताना त्यांनी अखेर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. या घडामोडींनंतर आंदोलनात सक्रिय असलेल्या ललिता तारख यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत काही गंभीर आरोप केले होते. तारख यांच्या आरोपांनंतर या प्रकरणाची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. मात्र, त्याचवेळी त्यांना लक्ष्य करत काही सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करण्यात आल्याचा आरोप आहे. काही जणांनी त्यांच्याबद्दल अश्लील स्वरूपाचे आरोप केले, तर काहींनी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित मजकूर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हा वाद आणखी वाढला. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या ललिता तारख यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. त्यांनी यापूर्वी दोन वेळा पोलिसांकडे तक्रार करून संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, आता या तक्रारींच्या अनुषंगाने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पाच जणांची नावे समोर आली असून, त्यांच्यासह अन्य 5 ते 6 अज्ञात व्यक्तींनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये काही जण फेसबुक, यूट्यूब आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया माध्यमांवर सक्रिय असल्याची माहिती आहे. तर काही जण सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करून तारख यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर पसरवत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्ट, कमेंट आणि संबंधित खात्यांची भूमिका तपासली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, एखाद्या आंदोलनात सहभागी असलेल्या व्यक्तीने आंदोलनातील नेतृत्वाविरोधात भूमिका मांडल्यानंतर सोशल मीडियावरून तिला लक्ष्य केल्याचा आरोप या घटनेतून पुढे आला आहे. आता अंबड पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जाणार असून, गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची भूमिका आणि सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या मजकुराची पडताळणी महत्त्वाची ठरणार आहे. हेही वाचा…
दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना:सहलीसाठी आलेल्या 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, पोलिसांनी सर्व मृतदेह बाहेर काढले कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी गुरुवारी (1 ऑक्टोबर) मोठी दुर्घटना घडली. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून सहलीसाठी आलेल्या 8 विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे दिवेआगर परिसरात मोठी खळबळ उडाली असून समुद्रकिनारी शोककळा पसरली आहे. सविस्तर वाचा…
Source link
मनोज जरांगेंच्या समर्थकांवर अखेर गुन्हा दाखल:महिला आंदोलकाच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई, 10 ते 11 जण अडचणीत