Headlines

Minakshi Shinde Blasts Thackeray Group Over Pradip Purnekar Murder Case


ठाण्यातील चितळसर-मानपाडा (प्रभाग क्र. ३) येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येवरून ठाकरे गटाकडून होणाऱ्या गंभीर आरोपांवर शिवसेना (शिंदे गट) नेत्या तथा ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पत्रक

.

तसेच, व्हायरल करण्यात आलेली ऑडिओ क्लिप ही बनावट आणि ‘एआय जनरेटेड’ असल्याचा दावा करत, “दिशा सालियान प्रकरणात एफआयआर आणि तक्रारीत अनेकदा नाव असताना आदित्य ठाकरेंना अटक का झाली नाही?” असा सवाल करत त्यांनी ठाकरे गटालाच थेट पिंजऱ्यात उभे केले.

मूळ एफआयआरमध्ये नाव नाही; लहान मुलाच्या तोंडात शब्द कोंबून राजकारण

पत्रकार परिषदेत बोलताना मीनाक्षी शिंदे यांनी ठाकरे गटाच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला. “हत्येनंतर नोंदवलेल्या मूळ एफआयआरमध्ये माझे किंवा माझ्या पतीचे नाव आरोपी म्हणून कुठेही नव्हते. मात्र, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मारून, मृतदेहाची विटंबना करत पोलिसांवर दबाव आणला आणि पुरवणी जबाबात संशयित म्हणून आमचे नाव गोवण्याची धडपड केली. गेल्या 20 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी इतके खालच्या पातळीचे राजकारण पाहिलेले नाही.”

“संवेदनशील परिस्थिती असताना पूर्णेकरांच्या लहान मुलाच्या तोंडातून जाणीवपूर्वक शब्द वदवून घेतले जात आहेत. रागाला डोळे आणि बुद्धी नसते, त्याचा गैरफायदा घेऊन कुटुंबीयांचे ‘ब्रेनवॉश’ केले जात आहे.”

चौकशीला सामोरे जाण्याची तयारी

“ठाणे पोलीस अत्यंत सक्षम असून मी आणि माझे पती चौकशीला पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत. उद्या विमानाचे अपहरण झाले तरी मीनाक्षी शिंदेंनीच केले असा आरोप हे करतील; पण न्यायालयात आणि कायद्यासमोर आरोपांना पुराव्यांची गरज असते,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.

व्हायरल ऑडिओ क्लिप AI जनरेटेड; पोलिसांत आधीच तक्रार

संजय राऊत यांनी समाजमाध्यमांवर शेअर केलेल्या धमकीच्या वादग्रस्त ऑडिओ क्लिपवर स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या, “ज्या ऑडिओ क्लिपवरून माझ्यावर चिखलफेक केली जात आहे, ती क्लिप पूर्णपणे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) द्वारे जनरेट केलेली बनावट क्लिप आहे. त्या ऑडिओ क्लिपचा आणि प्रदीप पूर्णेकरांचा काडीमात्र संबंध नाही. ती क्लिप जुनी असून ज्यावेळी ती पहिल्यांदा व्हायरल करण्यात आली होती, त्याच वेळी मी सायबर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवलेली आहे. आज राजकीय हेतूने ती पुन्हा पुढे आणली जात आहे.”

दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंना अटक का नाही?

आपल्या अटकेची मागणी करणाऱ्या संजय राऊत आणि ठाकरे गटावर पलटवार करताना त्यांनी कागदपत्रे दाखवून सवाल उपस्थित केला. “दिशा सालियान मृत्यू प्रकरणात तिच्या वडिलांनी उघडपणे आरोप केले आहेत. त्या प्रकरणातील कागदपत्रांमध्ये 5 ते 6 वेळा आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा उल्लेख आला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेचा वापर करून पुरावे नष्ट केले, असा आरोप आहे. जर नुसत्या संशयावरून मला अटक करण्याची मागणी त्यांचे कच्चे-बच्चे करत असतील, तर मग दिशा सालियान प्रकरणात अजूनपर्यंत आदित्य ठाकरेंना अटक का झाली नाही?” असा सवाल त्यांनी केला.

प्रभागात सर्वांशी संबंध; फोटो दाखवून कोणी आरोपी ठरत नाही

आरोपी पप्या शिंदे आणि इतरांसोबत असलेल्या संबंधांच्या चर्चेवर त्या म्हणाल्या, “माझे वय 51 वर्षे असून माझा जन्म त्याच प्रभागात झाला आहे. माझे पती तिथेच लहानाचे मोठे झाले आहेत. सार्वजनिक आणि राजकीय जीवनात वावरताना अनेक स्थानिक लोक भेटतात, फोटो काढतात. केवळ कोणासोबत फोटो आहे म्हणून कोणी हत्येचा आरोपी ठरत नाही.”

तपासात अडथळा आणणार नाही

“पोलीस तपास योग्य दिशेने सुरू असून दूध का दूध आणि पाणी का पाणी समोर येईल. पोलिसांच्या तपासात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून मी संयम बाळगून होते आणि कायदेशीर प्रक्रियेला आमचे पूर्ण सहकार्य राहील,” असे सांगत मीनाक्षी शिंदे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले.

——————————————–

हेही वाचा..

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: अलिबागमधून आणखी 2 आरोपींना बेड्या; माजी महापौर मीनाक्षी शिंदेंनी आरोप फेटाळले, पत्रकार परिषदेकडे लक्ष

मानपाडा परिसरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात ठाणे गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. या हत्येतील आणखी दोन मुख्य आरोपिंना पोलिसांनी मुंबई-गोवा महामार्गावरील अलिबागजवळ एका डेअरीतून बेड्या ठोकल्या आहेत. निखिल यादव आणि नितेश पवार अशी या अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहे. या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता तीनवर पोहोचली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.