Headlines

मुळा नदीतील बंधारे तुडुंब भरल्याने शेतकरी सुखावले:मांजरी,पानेगाव ग्रामस्थांकडून मुळामाईचे जलपूजन‎




राहुरी तालुक्यातील मुळा धरणातून मुळा नदीतील बंधारे पूर्ण क्षमतेने भरून दिल्याने मांजरी व पानेगाव येथील ग्रामस्थांच्यावतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे आभार व्यक्त करण्यात आले. मांजरी येथील मुळा नदीमध्ये जलपूजन कार्यक्रमात दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी मुळामाईचे यथावत जलपूजन केले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय समाज पक्षाचे नानाभाऊ जुंधारे म्हणाले, सध्या दुष्काळी स्थितीला शेतकरी सामोरा जात असताना आ. अक्षय कर्डिले आणि आ. प्राजक्त तनपुरे यांनी याबाबत पाठपुरावा केला तसेच नेवासा येथील आ. विठ्ठलराव लंघे यांनीही पानेगाव येथील ग्रामस्थांच्या मागणीला मान देत नदीला पाणी सोडण्यासाठी प्रयत्न केले. या भागातील शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनीही तात्काळ घोषणा करत पाणी सोडण्याचे आदेश दिल्याने शेतकरी त्यांचे आभारी राहतील. सध्या विखे जलसंपदा मंत्री असल्याने त्यांनी मुळा थडीला बंधाऱ्याचे पाणी आरक्षण करून न्याय द्यावा व कायमस्वरूपी हा प्रश्न सोडविण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. यावेळी मुळा नदीला जलाभिषेक करण्यात आला. कृती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय घोलप, किरण जाधव, विजय जंगले, भारत विटनोर, विलास सेंदोरे, विठ्ठल जाधव, भाऊसाहेब विटनोर, ग्रामपंचायत उपसरपंच कोंडीराम विटनोर, तुषार विटनोर, गोरख विटनोर, रावसाहेब भगत, बाबासाहेब विटनोर, अण्णासाहेब विटनोर आदींसह नागरिक उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *