![]()
महात्मा गांधी जयंतीनिमित्त शेवगाव नगरपरिषदेच्यावतीने प्रभाग क्रमांक ४ मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रभागातील विविध परिसरांची स्वच्छता करून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केली. या अभियानात नगरसेविका डॉ. गीता लांडे, आरोग्य विभागप्रमुख धरम, अभिजित लांडे, मुकादम संतोष मोहिते, संजय लांडे, मनोज चव्हाण, सचिन मोहिते व कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी नगरसेविका डॉ. लांडे यांनी नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व सांगत घरातील ओला, सुका कचरा स्वतंत्रपणे वर्गीकृत करून घंटागाडीतच टाकावा असे आवाहन केले. प्रभाग क्रमांक ४ हा स्वच्छ, सुंदर आणि आदर्श प्रभाग करण्याचा माझा संकल्प आहे. स्वच्छ परिसरासाठी नगरपरिषद प्रशासनासोबत नागरिकांचा सहभागही महत्त्वाचा आहे. प्रत्येक कुटुंबाने कचऱ्याचे योग्य पद्धतीने वर्गीकरण करून तो नियमितपणे घंटागाडीत द्यावा. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे टाळून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, तसेच प्रभागातील काही भागात घंटागाडी वेळेवर येत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असल्याचेही त्यांनी सांगितले. संबंधित भागात वेळेवर घंटागाडी उपलब्ध करून देण्याबरोबरच आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्वच्छता नियमित लोकचळवळ व्हावी, यासाठी सातत्याने जनजागृती करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
Source link
स्वच्छता नियमित लोकचळवळ होण्याची आता खरी आवश्यकता:शेवगावात गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान