Headlines

5000 मेंढ्यांसह बाळूमामांची पालखी किणीत:भजन-कीर्तनाने गाव दुमदुमले, आठ दिवस चालणार कार्यक्रम, रोज भाविकांसाठी 2 वेळा महाप्रसाद‎


.

आदमापूरचे आराध्य दैवत संत बाळूमामा यांच्या पालखी परिक्रमेचे गेल्या आठ दिवसांपासून किणी येथे आगमन झाले असून, ५ हजार मेंढ्या व शेळ्यांच्या लवाजम्यासह पालखी येथे मुक्कामी आहे. पालखीच्या आगमनाने किणी व पंचक्रोशीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

सायंकाळी भजन, भारूड आणि कीर्तनाची मेजवानी पालखी मुक्कामी असताना येथे दररोज सकाळ-संध्याकाळ विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. विशेषतः दररोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत भजन, भारूड, कीर्तनाचे कार्यक्रम होत असून, या कार्यक्रमांसाठी किणी व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. टाळ-मृदंगाच्या गजरात संपूर्ण परिसर बाळूमामाच्या जयघोषाने दुमदुमून जात आहे. ग्रामस्थांच्या वतीने दररोज सकाळी व सायंकाळी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप केले जात आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे गावातील महिला भाविकांकडून मेंढ्या राखणाऱ्या धनगर बांधवांना दररोज भाजी-भाकरी, चपाती, चटणी, लोणचे अशा प्रकारचे चुलीवरचे जेवण तयार करून अन्नदान केले जात आहे. गावात लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण संत बाळूमामाच्या भक्तांची व मेंढ्या राखणाऱ्या सेवेकऱ्यांची मनोभावे सेवा करत असून यामुळे गावात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले आहे. भाविकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालखी महोत्सव यात्रा कमिटीच्या वतीने केले आहे.

मेंढरांचा कळप अक्कलकोट तालुक्यात ११ दिवसांपूर्वी काझीकणवस येथे आला होता. त्यानंतर या मेंढ्यांचा मुक्काम आठ दिवसांपासून किणी येथे असून आणखी चार ते पाच दिवस राहण्याचा अंदाज आहे. या अदमापूर संस्थेअंतर्गत एकूण मेंढरांचे १९ गट (ग्रुप ) असून १० नंबरचा ग्रुप किणी येथे आला आहे. या बग्गीत ५००० मेंढ्या असल्याचे या ग्रुपचे प्रमुख काशिनाथ शिणगारे यांनी सांगितले

सकाळी : पालखीची आरती व दर्शन सायं. ६ ते ९ : भजन, भारूड ग्रामस्थांकडून दररोज दोन वेळा महाप्रसाद



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *