Headlines

विधान परिषद निवडणुकीसाठी 16 उमेदवारांनी अर्ज दाखल केले:अमरावती शिक्षक मतदारसंघात आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस




अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत १६ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. मंगळवार, ६ ऑक्टोबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. सोमवार, ५ ऑक्टोबर रोजी ११ उमेदवारांनी १८ उमेदवारी अर्ज दाखल केले. यात दिलीप कडू (अपक्ष), डॉ. प्रशांत विघे (अपक्ष), दत्तात्रय लहाने (शिवसेना उबाठा व अपक्ष), सुरेश देवकर (समाजवादी गणराज्य पार्टी व अपक्ष), गजानन डोके (भारतीय जनसम्राट पार्टी), भोयर चंद्रशेखर (भाजपा व अपक्ष), सुनील राठोड (अपक्ष), सुमित पवार (अपक्ष), गजानन उल्हे (अपक्ष), किसनराव सरनाईक (शिवसेना व अपक्ष) आणि अविनाश बोर्डे (अपक्ष) यांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार, बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख शुक्रवार, ९ ऑक्टोबर आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *