Headlines

शिवरा गावात नागरिकांना माहिती न देताच ग्रामसभा घेतली:ग्रामस्थांनी जि.प. सीईओंकडे तक्रार केली, प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष




अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवरा गावात नागरिकांना योग्य माहिती न देता ग्रामसभा घेण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. नियमानुसार गावात नोटीस लावणे, दवंडी देणे आणि नागरिकांना माहिती देणे अपेक्षित होते, पण हे केले नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबद्दल जिल्हा परिषदेचे सीईओ सत्यम गांधी यांच्याकडे तक्रार केली आहे. प्रशासन दोषींवर काय कारवाई करते, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. ग्रामसेवक संघटनेच्या बहिष्कारामुळे ग्रामसभा वारंवार रद्द होत आहेत. नागरिकांना विश्वास घेऊन लवकरात लवकर नियमानुसार ग्रामसभा घ्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. ग्रामसभा घेण्यात उशीर होत असल्याने गावातील प्रश्नांवर चर्चा होत नाही. लवकर ग्रामसभा घेऊन प्रश्नांची उत्तरे न मिळाल्यास विभागीय आयुक्तांकडे दाद मागू, असा इशारा शिवरा येथील ग्रामस्थांनी दिला आहे. यापूर्वीही शिवरा ग्रामपंचायतीने काही ग्रामसभा नागरिकांना माहिती न देताच घेतल्या होत्या. त्या ग्रामसभा नियमानुसार झाल्या होत्या का, याबाबतही आता चर्चा सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *