![]()
तालुक्यातील हनुमंतखेडा येथे कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू असतानाच पंचनाम्याच्या फॉर्मसाठी शेतकऱ्यांकडून प्रत्येकी ६० रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. गावातील सुमारे ७०० शेतकऱ्यांकडून प्रत्येकी ६० रुपये घेतले असल्यास ही रक्कम सुमारे ४२ हजार रुपये होते, असा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित तलाठी गणेश ठोंबरे यांनी सोशल मीडियावर चुकीची व बदनामीकारक पोस्ट प्रसारित केल्याचा आरोप करत बनोटी पोलिस चौकीत तक्रार अर्ज दिला आहे. ४ ऑक्टोबर रोजी तलाठी गणेश ठोंबरे हे गावात पिकांची पाहणी व पंचनामे करण्यासाठी आले होते. पंचनाम्याच्या फॉर्मसाठी गावातील काही राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून प्रत्येकी ६० रुपये घेतल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात आला. दरम्यान, या आरोपांवर तलाठी गणेश द्वारकू ठोंबरे यांनी बनोटी पोलिस चौकीत लेखी तक्रार दिली आहे. या प्रकारामुळे आपली तसेच महसूल विभागाची बदनामी होत असल्याचे नमूद करत तलाठी ठोंबरे यांनी पुढील योग्य ती कायदेशीर
Source link
पंचनाम्यासाठी 60 रुपये घेतल्याचा आरोप; तलाठ्यांकडून तक्रार दाखल:महसूल प्रशासनाकडे चौकशीची मागणी; सोयगाव तालुक्यातील घटना