Headlines

‘कोणार्क’ची स्वच्छतेत पुन्हा हाराकिरी; घंटागाड्या नसल्याने कचरा उचल ठप्प:थकीत वेतनासाठी कर्मचाऱ्यांची कोणार्क कंपनीच्या कारभाराविरोधात तक्रार दाखल‎


.

कोणार्कमुळे शहरवासी मेटाकुटीस आले आहेत. या कंपनीला मनपाने शहर स्वच्छतेचे कंत्राट दिल्यापासून अस्वच्छतेवरून गदारोळ होत असून, आज या कारणाने कामबंद तर उद्या दुसऱ्या कारणाने कामबंद असे सुरू असताना मनपा या कंपनीला स्वच्छतेच्या कामावरून कमी का करीत नाही, असा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे. कारण, अनेक ठिकाणी गत २० दिवस ते एक महिन्यापासून घंटागाडीद्वारे कचऱ्याची उचलच झाली नाही. कोणार्कच्या समन्वयकांसह मनपा स्वच्छता विभागाने शहरात स्वच्छतेचे काम सुरू झाल्याचे सांगितल्यानंतरही बोटावर मोजता येतील, एवढ्याच ठिकाणी काम सुरू आहे. शहरातील नव्या भागांत तर घंटागाडी नागरिकांनी महिन्यापासून पाहिली नाही.

एकीकडे कोणार्क कंपनी कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देत नसून, त्यांच्याकडे स्वच्छतेची पुरेशी यंत्रणाच नाही. त्यामुळे कर्मचारी काम करण्यास नकार देतात. ते बघता मनपाला कर्मचाऱ्यांचे वेतन कोणार्कने करावे म्हणून त्यांना ४ कोटीच्या बिलाची रक्कम द्यावी लागली. पैसा खर्च होत असल्यामुळे मनपाने कोणार्कविरोधात कठोर पावले उचलली नाही तर शहरात अस्वच्छता वाढून त्याचे गंभीर परिणाम सहन करावे लागतील. एखादवेळी कीटकजन्य आजार, साथरोग बळावू शकतात. कोणार्क कंपनीला महापालिकेने १०० वर स्वच्छता वाहने असावीत, असे म्हटले होते. वाहने जुळवण्यासाठी तीन महिन्यांची वेळही दिली होती. या कालावधीत शहरातील जुन्या कंत्राटदारांकडे असलेली वाहने कोणार्कने भाड्याने घेतली. परंतु, उच्च न्यायालयाने त्यांना अपात्र ठरवल्यानंतर जुन्या स्वच्छता कंत्राटदारांनी त्यांची वाहने परत घेतली. त्यामुळे साहजिकच कोणार्ककडील ७० वर स्वच्छता वाहने कमी झाली. परिणामी पूर्ण क्षमतेने शहराची स्वच्छता होईनाशी झाली आहे. कोणार्कला स्वच्छतेचे काम पूर्ण क्षमतेने करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्याकडे घंटा गाड्यांची उणीव असल्यामुळे शहराच्या काही भागात घरोघरी कचरा संकलन होईनासे झाले आहे. त्यात हळूहळू सुधारणा केली जात आहे. -भाग्यश्री बोरेकर, उपायुक्त, मनपा. कोणार्क कंपनी सफाई कामगारांच्या वेतनासह पीएफ, ईएसआयसी व अन्य सुरक्षा अधिकारांकडे दुर्लक्ष करीत आहे. किमान वेतनापेक्षा कमी वेतन दिले जात असून, पीएफ-ईएसआयसीची अनियमित कपात व भरणा केला जात आहे. वेतनाची पावती दिली जात नसून, दोन महिने वेतन थकित ठेवले जात असल्याची तक्रार सफाई कामगारांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व कामगार आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यात कोणार्कच्या कामगार रेकॉर्डची तपासणी करावी या मागणीसह महिन्याला १५ हजारांवर वेतन अपेक्षित असताना १२ हजार रु. वेतन दिले जात असल्याची माहितीही दिली आहे. सोबतच वेतनाची पावती मागितल्यास कामावरून कमी करण्याची धमकी दिली जात असल्याचीही तक्रार केली.

पूर्ण क्षमतेने कामाचे आदेश

कंत्राटदारांनी वाहने परत घेतल्याने घंटागाड्या कमी

महापालिका प्रशासनाची स्वतःची यंत्रणाच नाही शहरात अस्वच्छता, कचऱ्यावरून आणीबाणीची स्थिती उद्भवल्यास उपाययोजना सुरू करता येईल इतपत यंत्रणा महापालिकेकडे नाही. काही स्थायी स्वच्छता कर्मचारी आहेत. म्हणून मनपाला स्वच्छता कंत्राटदारावरच अवलंबून राहावे लागते. कारण, कोट्यवधी रुपये महिन्याला कंत्राटदाराला द्यावे लागतात. अशात कंत्राटदाराने जर स्वच्छतेच्या कामात हाराकिरी केली तर मनपा हतबल होते. त्यामुळे शहरवासीयांचा त्रास वाढला आहे.

गणेशोत्सवापासून वाढली शहर परिसरात अस्वच्छता ^गणेशोत्सवापासून शहरात अस्वच्छता वाढली आहे. कचरा वाढत असताना त्या तुलनेत स्वच्छता होत नसल्याने शहरात अस्वच्छता दृष्टीस पडत आहे. महापालिका स्वच्छता शुल्क घेते तेव्हा त्यांनी पर्यायी व्यवस्था करावी. -सारंग बोलके, नागरिक.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *