![]()
संत सोयराबाई यांच्या जीवनावर आधारित ‘पांडुरंग रंगी रंगली सोयरा’ या नाटकाचा प्रयोग मंगळवेढ्यात सादर करण्यात आला. संत सोयराबाई यांचे पती संत चोखामेळा यांची जन्मभूमी असलेल्या मंगळवेढ्यात या नाटकाचा प्रयोग झाला. यात संत सोयराबाईंच्या अभंगांतून समतेचा संद
.
या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन विनय प्रताप गिरकर यांनी केले आहे. भजनसम्राट मस्तान मुल्ला यांचे संगीत हे नाटकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले. संत सोयराबाई आणि संत चोखामेळा यांच्या अभंगांना भजनरूपातून सादर करत त्यांनी भक्तिरसपूर्ण वातावरणनिर्मिती केली. अभंगांमधील भावार्थ, संगीताची लय आणि नाट्यप्रसंगांची मांडणी यांमुळे नाटकातील आध्यात्मिक आशय अधिक प्रभावीपणे व्यक्त झाला.
सुनील देवळेकर यांनी नेपथ्य आणि प्रकाशयोजनेची जबाबदारी सांभाळली. नंदू वर्धम यांनी केलेल्या रंगभूषेमुळे नाटकातील पात्रांना जिवंतपणा प्राप्त झाला. अमिता कदम यांनी वेशभूषा आणि केशभूषेची जबाबदारी सांभाळली. अभिलेश सरपडवळ यांनी पार्श्वसंगीताची बाजू समर्थपणे सांभाळली. सहाय्यक दिग्दर्शक अमिय खवास यांच्या सहकार्यामुळे नाटकाच्या सादरीकरणाला भक्कम आधार मिळाला. या नाटकात अमोल जाधव, अशोक निकाळजे, सुनील लोहाटे, विनायक शानभाग, विनय पी. गिरकर, समृद्धी देसाई, गार्गी सावंत, क्रांती देशमुख आणि संध्या गायकवाड यांनी भूमिका साकारल्या. कलाकारांच्या अभिनयातून संत सोयराबाईंचे जीवन, त्यांची भक्ती आणि सामाजिक जाणिवा उलगडल्या गेल्या.
संतांच्या अभंगांतून तत्कालीन परिस्थितीचे दर्शन संत सोयराबाई यांनी प्रतिकूल सामाजिक परिस्थितीतही आपल्या अभंगवाणीतून समतेचा विचार मांडला. तत्कालीन समाजव्यवस्थेतील विषमतेवर भाष्य करताना त्यांनी भक्तीच्या माध्यमातून माणसाच्या अंतर्मनातील चांगुलपणा आणि आध्यात्मिक सामर्थ्य अधोरेखित केले. त्यांच्या अभंगांमध्ये जीवनाचे सार सांगणारी अनुभूती, सात्त्विक वृत्ती, सहनशीलता आणि प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर पाहण्याची दृष्टी दिसून येते. माणसाची ओळख त्याच्या जन्मावरून नव्हे, तर त्याच्या विचारांवरून आणि आचरणावरून व्हावी, असा समतेचा संदेश त्यांच्या रचनांमधून प्रभावीपणे व्यक्त होतो.