![]()
जिल्ह्यातील साखर कारखानदार ऊसाला जोपर्यंत पहिली उचल प्रतिमेट्रिक टन ४५०० रुपये आणि अंतिम दर ५००० हजार रुपये जाहीर करत नाहीत, तोपर्यंत आपल्या उसाला कोयता लावू देऊ नका, असे आवाहन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रयत क्रांती शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक भोस
.
वडापूर (ता. दक्षिण सोलापूर) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दर संघर्ष समितीचा शेतकरी मेळावा झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अरुण पाटील होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, निवास नागणे, अतुल फाटे, कृष्णप्पा बिराजदार, सिद्धाराम काकणगी, वडापूरचे अरुण पाटील, गणपती पुजारी, सुभाष पाटील, नामदेव गायकवाड व शेतकरी उपस्थित होते.
जिल्ह्यात ऊस दरासाठी वडापूर गावातून आंदोलन सुरू केले आहे. आता हे आंदोलन कारखानदारांनी योग्य दर जाहीर केल्याशिवाय थांबणार नाही, असा इशारा देत दीपक भोसले म्हणाले, शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. त्याच्या घामाला योग्य दाम मिळावा. तो सन्मानाने जगावा. एवढीच आमची अपेक्षा आहे. पण कारखानदार योग्य दर देत नसल्याने आंदोलन करावे लागत आहे.
जिल्हाध्यक्ष समाधान फाटे यांनी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळत नाही. त्यामुळे आत्महत्या करण्याचे पाऊल ते उचलत आहेत. परिणामी त्याचे कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात अरुण पाटील यांनी गतवर्षी कारखानदारांनी शेतकऱ्यावर कशा पद्धतीने अन्याय केला हे उदाहरणासह सांगितले. प्रस्ताविक सुभाष पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. महेश पाटील यांनी केले तर आभार तुकाराम गुरव यांनी मानले.