Headlines

राज्य सरकारचा मोठा निर्णय!:अंगणवाडी सेविकांना 2 हजारांची भाऊबीज, 42 कोटींच्या निधींची तरतूद; मंत्री अदिती तटकरेंची माहिती




यंदाच्या दिवाळीवर दुष्काळाचे मोठे सावट असून राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्य सरकारने 300 हून अधिक तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून शेतातील पिकांचे पंचनामेही पूर्ण करण्यात आले आहेत. बळीराजाला नेमकी मदत कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देत दिवाळीपूर्वीच 5 हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यासोबतच राज्य सरकारने राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठीही आनंदाची बातमी दिली आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना शासनाकडून दिवाळीपूर्वीच ‘भाऊबीज भेट’ म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. 42 कोटींच्या निधीची तरतूद सद्यस्थितीत राज्यामध्ये 1 लाख 8 हजार 627 अंगणवाडी सेविका आणि 1 लाख 5 हजार 470 अंगणवाडी मदतनीस कार्यरत आहेत. या दोन्ही पदांची मिळून एकूण संख्या 2 लाख 14 हजार 97 इतकी आहे. या सर्व कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची भाऊबीज भेट दिली जाणार असून, या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी शासनाने 42 कोटी 81 लाख 94 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सेविकांची दिवाळी होणार गोड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील गर्भवती महिला, स्तनदा माता आणि बालकांच्या पोषणाची अहोरात्र काळजी घेणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची दिवाळी अधिक आनंदात जावी आणि ती गोड व्हावी, हाच या निर्णयामागील शासनाचा मुख्य उद्देश असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा.. राज्य सरकारचा बळीराजाला दिलासा:दुष्काळग्रस्तांना दिवाळीपूर्वी 5 हजारांची अग्रीम मदत; चारा हमीभावाने खरेदीसह मुख्यमंत्री फडणवीसांचे 4 मोठे निर्णय राज्यातील दुष्काळाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन राज्य मंत्रिमंडळाने बळीराजाला मोठा दिलासा देणारे चार महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. पूर्वी जाहीर केलेल्या 265 तालुक्यांमध्ये आणखी 40 तालुक्यांची भर घालत आता राज्यातील तब्बल 305 तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *