![]()
उबाठा नेते प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात एक महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या जुन्या वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचा जबाब आरोपींनी उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सच्या (एसटीएफ) चौकशीदरम्यान दिल्याचा दावा कुटुंबीयांच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे. प्रदीप पूर्णेकर यांची २९ सप्टेंबर २०२६ रोजी ठाण्यातील मानपाडा परिसरात त्यांच्या पक्ष कार्यालयात घुसून गोळीबार आणि धारदार शस्त्राने वार करत निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली आणि अमित सिंह ऊर्फ पपलू यांना उत्तर प्रदेश एसटीएफ व ठाणे शहर गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने ९ ऑक्टोबर रोजी प्रयागराज येथून बेड्या ठोकल्या होत्या. पूर्णेकर कुटुंबीयांचे वकील समीर हाटले यांनी १० ऑक्टोबर रोजीच्या यूपी एसटीएफच्या प्रसिद्धिपत्रकाचा संदर्भ देत न्यायालयात हा मुद्दा मांडल्याचे सांगण्यात येत आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गेल्या आठ महिन्यांत ठाण्यात तब्बल ५९ खून झाले आहेत. ठाण्यात येणारे मोठे प्रोजेक्ट्स आणि त्यामागील पैसा यातूनच विरोधकांना संपवण्याचे राजकारण सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. २४ सप्टेंबरला ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक किसन कमलाकर भोईर यांची हत्या झाली. २९ सप्टेंबरला प्रदीप पूर्णेकर, भिवंडी उल्हासनगरमध्येही हत्या झाल्या.त्यामुळे त्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
Source link
ठाणे मनपा निवडणुकीच्या वादातूनच पूर्णेकरांची हत्या:आरोपींनी कबुली दिल्याचा कुटुंबीयांचा दावा