Headlines

साखर उत्पादनात 10 लाख मे. टन घट:21 कारखान्यांकडे 119 कोटी एफआरपी थकीत, दुष्काळाचा साखर उद्योगाला फटका; इथेनॉल उत्पादनात 30 टक्के घट




राज्यातील अनियमित पाऊस आणि दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा ऊस उत्पादनात मोठी घट होणार आहे. परिणामी, यंदा राज्यातील इथेनॉल उत्पादनात सुमारे ३० टक्क्यांची घसरण होण्याचा अंदाज आहे. तसेच साखरेचे उत्पादनही गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे १० लाख मेट्रिक टनांनी घटण्याची शक्यता आहे. यामुळे यंदाचा ऊस गाळप हंगाम केवळ ९० दिवसांवर मर्यादित राहील, अशी माहिती साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दिली. गेल्या हंगामात राज्यात ९९ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले होते. यंदा ते ८९ ते ९० लाख टनांवर थांबेल. तसेच उसाचे गाळप मागील वर्षीच्या १,०४५ लाख टनांवरून यंदा सुमारे ९०० लाख टनांवर घसरण्याचा अंदाज कृषी विभाग आणि तज्ज्ञ समितीने व्यक्त केला आहे. ठिबक सिंचनावर भर द्यावा मान्सून राज्यातून परतल्याने पाण्याची उपलब्धता कमी होत असून, त्याचा परिणाम ऊस उत्पादनावर होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा वापर वाढवणे, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर भर द्यावा. शेतकरी बाजारावर काय परिणाम
गाळप हंगाम ९० दिवसांवर आल्याने काय नुकसान होईल?
– साखर कारखान्यांचा गाळप खर्च वाढेल. ऊसतोड मजूर आणि वाहतूकदारांचा रोजगार १५ ते २० दिवसांनी घटेल.
इथेनॉल उत्पादनातील ३० टक्के घटीचा फटका कुणाला?
– ज्या कारखान्यांनी बँकांकडून कोट्यवधींचे कर्ज घेऊन इथेनॉल प्रकल्प उभारले, त्यांना कर्जाचे हप्ते फेडणे कठीण होईल. याचा थेट परिणाम कारखान्यांच्या नफ्यावर आणि शेतकऱ्यांच्या एफआरपी वितरणावर होऊ शकतो.
सर्वसामान्यांसाठी साखरेचे दर वाढणार का?
– देशांतर्गत साठा पुरेसा आहे. सणासुदीच्या काळात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थितीनुसार साखरेच्या दरात चढ-उतार. इथेनॉल प्रकल्पांसमोर आहे मोठा धोरणात्मक पेच राज्यातील कारखान्यांची वार्षिक इथेनॉल उत्पादन क्षमता २९६ कोटी लिटर असून यासाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. तेल कंपन्यांची राष्ट्रीय मागणी १,१०० कोटी लिटर असून त्यात महाराष्ट्राचा वाटा १०० ते १२० कोटी लिटर आहे. मात्र, केंद्राने यंदा उसाचा रस, सिरप आणि बी-हेवी मळीपासून इथेनॉल खरेदीवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे कारखान्यांना केवळ सी-हेवी मळी आणि धान्यापासून इथेनॉल निर्मिती करावी लागणार असल्याने उद्योगाचे आर्थिक गणित बिघडण्याची चिन्हे आहेत. कारखान्यांवर कारवाई करू मागील हंगामातील ९९.७१ टक्के एफआरपी अदा झाली असली, तरी २१ कारखान्यांकडे अद्याप ११९ कोटी रुपये थकीत आहेत. यातील १२ ते १३ कारखान्यांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत देण्याचे मान्य केले असून, उर्वरित कारखान्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *