![]()
अमरावती दर्यापूर तालुक्यासह दुष्काळ घोषित केलेल्या राज्यातील सर्व तालुक्यांतील शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये, शेतमजुरांना २५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी. संपूर्ण कर्जमाफी करावी. या प्रमुख मागण्यांसाठी आज, सोमवारी, सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. दर्यापूर तहसील कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. उत्पादन खर्च वाढला आहे. कर्जाचा बोजा वाढला आहे. पाणीटंचाई आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शासनाने शेतकरी, शेतमजुरांना ठोस आर्थिक मदत द्यावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये द्यावेत. शेतमजुरांना उदरनिर्वाहासाठी २५ हजार रुपयांची मदत द्यावी. पीक कर्जासह शेतीशी संबंधित पात्र कर्जांची संपूर्ण कर्जमाफी करावी. पूर्वीच्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही माफी द्यावी. कर्जवसुलीला नियमानुसार स्थगिती द्यावी. अशा मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी डॉ. राजेश्वर हांडे, तहसीलदार डॉ. रवींद्रकुमार कानडजे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देण्यात आले. शासनाने या मागण्यांवर तातडीने निर्णय न घेतल्यास येत्या काळात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. यावेळी झालेल्या धावपळीत एसडीओ कार्यालयातील कुंड्याची तोडफोड झाली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. या आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील गावंडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल जळमकर, तालुकाध्यक्ष डॉ. अभय पाटील गावंडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश कावडकर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव कॉ. अनिकेत वाकपांजर, काँग्रेसचे सरचिटणीस नितेश वानखडे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चंदुभाऊ रायबोले, शिवसेनेचे विधानसभा संघटक बबनराव विल्हेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गुड्डू पटेल, काँग्रेसचे अतिश शिरभाते, शिवसेना उपशहर प्रमुख दीपक बागडे, किसान सभेचे कॉ. प्रा. डॉ. ओमप्रकाश कुटेमाटे, शेतकरी संघटनेचे सुनील साबळे, भारत आठवले, सागर गिर्हे, राजेंद्र पाटील वडाळ, पार्थ लोडम, कॉ. अशोक पाटील कोकाटे, विजय चौरपगार, प्रशांत गावंडे, आसिफ भाई, बाबुलाल राऊत, अमित होले, राजाभाऊ तराळे, नमीत हुतके, भूषण जंगले, अजय देशमुख, नितीन गाडे, रसूल शाह, विष्णू काळमेघ, सुधीर पवित्रकर, गणेश अरबट, संजय हाडोळे, बबनराव देशमुख, जगदीश कांबळे, सचिन साळवे, संजय पांचबुडे, सुधीर लोडम, गुड्डू लोडम व शेतकरी सहभागी झाले होते. दर्यापूर येथील रास्ता रोको आंदोलनात सहभागी झालेले सर्वपक्षीय पदाधिकारी-कार्यकर्ते . मदतनिधीच्या रकमेचा निषेध शासनाने जाहीर केलेल्या पाच हजार रुपयांच्या मदतनिधीचा प्रतीकात्मक भिकेचा कटोरा देऊन आम्ही निषेध केला. शेतकऱ्यांच्या नुकसानाच्या तुलनेत पाच हजार रुपयांची मदत अत्यंत अपुरी आहे. मुळात शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत नको. हक्काची नुकसानभरपाई द्यावी,अशी मागणी आंदोलनकर्त्यांचे प्रतिनिधी प्रा. डॉ. ओमप्रकाश कुटेमाटे यांनी दिली. या आंदोलकांच्या मागण्या मायक्रोफायनान्सच्या वसुलीवर रोख लावावा. दुष्काळ निवारणाचे निकष, निधी, मदतीचे वेळापत्रक जाहीर करावे. ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत १५० दिवसांपर्यंत रोजगार उपलब्ध करून द्यावा. पिण्याच्या पाण्याची, जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करावी. वीजपुरवठा खंडित करू नये. शैक्षणिक शुल्कात सवलत द्यावी. जलसंधारणाची कामे तातडीने हाती घ्यावीत.
Source link
आक्रोश:दर्यापुरात सर्वपक्षीय रास्ता रोको, शेतकऱ्यांना एकरी 50 हजार, शेतमजुरांना 25 हजार देण्याची मागणी