Headlines

कर्नाटकचे मुख्यमंत्री बैठक घेतात, पण महाराष्ट्र सरकारला वेळ नाही:ऊस दरावरून राजू शेट्टींचा संताप, ऑक्टोबरला काढणार भव्य रॅली




आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर उसाच्या दराचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे आहेत. जोपर्यंत उसाचा दर निश्चित होत नाही, तोपर्यंत राज्यात उसाचे एक कांडंही तोडू देणार नाही, असा थेट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकार आणि साखर कारखानदारांना दिला आहे. तसेच, शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी येत्या २५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यात भव्य मोटरसायकल रॅली काढण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. ‘कर्नाटक सरकार पुढाकार घेतंय, पण महाराष्ट्र सरकार गप्प’: राज्य सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत राजू शेट्टी म्हणाले, “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेऊन २६ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता बेळगाव येथे साखर कारखानदार आणि शेतकऱ्यांची बैठक बोलावली आहे. मात्र, महाराष्ट्राचे सरकार याप्रश्नी काहीच करायला तयार नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.” ‘पहिली उचल जाहीर करा, अन्यथा कारखाने बंद पाडू’ साखर कारखानदारांना इशारा देताना शेट्टी म्हणाले, “महाराष्ट्र सरकार काहीच करत नसलेल्या परिस्थितीत साखर कारखानदारांनी स्वतःहून शेतकऱ्यांशी चर्चा करावी. त्यांना विश्वासात घेऊन, उसाची ‘एमएसपी’ (MSP) निश्चित होईपर्यंत पहिली उचल जाहीर करावी. जर असे झाले नाही, तर आम्ही एकही कारखाना चालू करून देणार नाही, असा ठाम निर्णय घेतला आहे.” २५ ऑक्टोबरला भव्य मोटरसायकल रॅली ऊस दराच्या लढ्यासाठी आणि शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी राजू शेट्टी स्वतः रस्त्यावर उतरणार आहेत. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९:३० वाजता हातकणंगले येथून ते हजारो शेतकऱ्यांसोबत मोटरसायकल रॅलीची सुरुवात करणार आहेत. रॅलीचा मार्ग ही रॅली हातकणंगले येथून सुरू होऊन कुंभोज, वाठार, वारणानगर, असुर्ले, पोर्ले, कुंभी कासारी, भोगावती, बिद्री, हमीदवाडा आणि शाहू या मार्गावरून जाईल. संध्याकाळी सांगाव येथे एका मोठ्या जाहीर सभेने या रॅलीचा समारोप होणार आहे. या लढ्यात मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे. ——————– हेही वाचा.. उदयनराजे, शिवेंद्रराजेंची 10 वर्षांच्या निकषामुळे माघार:‘का मीच पाहिजे सगळीकडे?’; उदयनराजेंचा सवाल, शिवेंद्रराजेंनीही निकषाचे दिले कारण
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 10 वर्षांच्या निकषामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार 10 वर्षांचा निकष लागू होत असल्याने अनेक दिग्गज नेत्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावे लागले आहेत. यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांचाही समावेश असून, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली. ‘का मीच पाहिजे सगळीकडे? सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे,’ असे म्हणत उदयनराजेंनी नव्या नेतृत्वाला संधी देण्याची भूमिका मांडली. कायद्याचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखून माघार घेतल्याचे स्पष्ट केले. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *