![]()
अहिल्यानगर शहरात एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने ओळखीच्या ३५ वर्षीय महिलेवर थेट गोळी झाडली. त्यानंतर काही अंतरावर जाऊन स्वतः डाेक्यात गाेळी मारून घेत अात्महत्या केली. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अहिल्यानगरमधील एका परिसरातील चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ही घटना घडली. योगेश डोंगरे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो महिलेला भेटीसाठी आला असता त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला. संतापाच्या भरात योगेशने स्वतःजवळील बंदुकीतून महिलेवर गोळी झाडली. महिलेला रक्ताच्या थारोळ्यात सोडून योगेशने तेथून पळ काढला. काही वेळातच त्याने कापूरवाडी परिसरात जाऊन स्वतःवरही गोळी झाडून घेत जीवनयात्रा संपवल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. गंभीर जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. ‘अमिग्डाला हायजॅक’ चा प्रकार एकतर्फी प्रेम किंवा रागात जेव्हा व्यक्ती अचानक गोळीबार किंवा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलते, तेव्हा मानसशास्त्रात त्याला ‘अमिग्डाला हायजॅक’ म्हणतात. यात मेंदूचा विचार करणारा भाग काही क्षणांसाठी काम करणे थांबवतो.
Source link
महिलेला गोळी मारून तरुणाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या:एकतर्फी प्रेमातू अहिल्यानगरातील घटना, महिला जखमी