![]()
तुळजाभवानीच्या दर्शनाला पायी जाणाऱ्या भाविकांना पाठीमागून आलेल्या भरधाव कंटेनरने धडक दिली. या अपघातात एका भाविकाचा मृत्यू झाला, तर अन्य ६ जण गंभीर जखमी झाले. सोलापूर-हैदराबाद रोडवरील नळदुर्ग बायपास रस्त्यावर २३ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी कर्नाटकातील भाविक मोठ्या संख्येने तुळजापूरकडे पायी जात आहेत. २३ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता कर्नाटकातील बसवकल्याण येथील ७ मित्रांचा गट पायी तुळजापूरकडे निघाला होता. नळदुर्ग बायपास रस्त्यावरून जात असताना हैदराबादहून मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरच्या (क्र. एमएच ०४ एनबी ९६७१) चालकाचे नियंत्रण सुटले. अपघातातील मृत गुरुसिद्ध कुंभार व सहा जखमी हे मित्र आहेत. ते सर्वजण बसवकल्याण येथील सुभाष चौक परिसरातील रहिवासी आहेत. मृत गुरुसिद्ध कुंभार याचे दीड वर्षापूर्वीच लग्न झाले होते. त्याच्या अपघाती मृत्युमुळे हळहळ व्यक्त होत आहे. ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या परिसरात गेल्या ३ वर्षांत ५ अपघातांमध्ये १० जणांचा बळी गेला आहे. कोजागरी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस या मार्गावर पायी जाणारे भाविक वाढणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी वाहने संथ गतीने चालवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे कंटेनर मागून थेट पायी चालणाऱ्या भाविकांच्या अंगावर गेला. या अपघातात गुरुसिद्ध बाबुराव कुंभार (३०, रा. सुभाष चौक, बसवकल्याण, जि.बिदर, कर्नाटक) हा तरुण जागीच ठार झाला. तर विरेश कुंभार (२७), विरेश चौधरी (२७), संगमेश्वर बेलुरे (३३), रोहन हंचाटे (२६), महादेव मठपती (२६) आणि मडीवळप्पा जमादार (२६, सर्व रा. बसवकल्याण, जि. बिदर) हे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक अख्तर सय्यद व नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने तात्काळ अपघातस्थळी धाव घेतली. जखमींवर नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. सर्व जखमींवर डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरु केले. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीवेळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी ती सुरळीत केली.
Source link
बिदर ते तुळजापूर पायी जाणाऱ्या भाविकांना कंटेनरची धडक; 1 ठार:6 जखमी, सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील नळदुर्ग बायपासवर अपघात