राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे केसाने गळा कापतात. ते मला जीवे मारण्याची सुपारी देण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील संघर्ष दिवसेंद
.
आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की, सुनील तटकरे हे केसाने गळा कापणारे नेतृत्व आहे. त्यांनी मला मारण्याची सुपारी देण्याचा प्रयत्न करत आहे. अशा पद्धतीने मला संपवण्याचा डाव सुद्धा सुनील तटकरे आखत आहेत. आप-आपसात वाद लावून द्यायचे आणि मग काय व्हायचे ते होईल असे काम सुरू आहे. हा माणूस कधीही घात करु शकतो हे मी शिंदेंना जाऊन सांगितले आहे.
..तर त्यांचा मुलगा आमदार झाला नसता
महेंद्र थोरवे म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आपण अनिकेत तटकरे यांना विधानपरिषद निवडणुकीत आमदार करण्यासाठी प्रामाणिक मदत केली होती. मात्र, आता त्यांची भूमिका बदलल्याचे दिसत आहे. आम्ही त्यावेळी फार मोठी चूक केली. जर त्यावेळी आम्ही त्यांच्याविरोधात भूमिका घेतली असती, तर त्यांचा मुलगा आमदार झालाच नसता.
टोरंटला दिला पाठिंबा
महेंद्र थोरवे म्हणाले की, कर्जतमध्ये टोरंटसारखा प्रकल्प येत आहे. त्याला केंद्र सरकारने सुद्धा मान्यता दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यात वीजेची कमतरता पुढेही भासू नये यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून वेगवेगळे प्रकल्प या राज्यात येत असताना हायड्रो प्रोजेक्ट या ठिकाणी उभा राहत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जे प्रकल्प येत आहेत त्यांना प्राधान्य देण्यासाठी आम्ही या प्रकल्पासोबत आहोत. स्थानिक शेतकऱ्यांचा समस्या या प्रकल्पाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.
नव्याने वृक्ष लागवड करणार
महेंद्र थोरवे म्हणाले की, कर्जतमध्ये प्रकल्पासाठी जी वृक्षतोड होत आहे तेवढी झाडे नव्याने लावण्यासाठी प्रयत्न राज्य सरकार आणि टोरंट कंपनीच्या मार्फत करणार आहे. स्थानिकांचा प्रश्न मार्गी लावल्यावर आम्ही या प्रकल्पाला सहकार्य करणार आहोत. विरोधक त्यांची भूमिका बजावत आहे. सरकारमार्फत नवे प्रकल्प येत असताना त्याला कोणी विरोध करू नये. कर्जतचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. पर्यटन आणि असे प्रकल्प आले तर रोजगाराच्या नव्या संधी स्थानिकांना मिळतील.
हे ही वृत्त वाचा
पोस्ट टाकण्याचे 500 मिळतात, पण डिलीट करायलाही पैसे मिळतात:एका फोनवर राज ठाकरेंनी पोस्ट डिलीट केली, सुजात आंबेडकरांचा आरोप

भाजप आणि काँग्रेसचे लोक 500 रुपये घेऊन सोशल मीडियावर पोस्ट करतात, कमेंट करतात आणि इतरांना ट्रोल करतात. पण आता एक नवीन पॅटर्न समोर आला आहे. मुंबईतील एक मोठे नेते राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. मात्र, मुंबई पोलिसांच्या किंवा गौतम अदानी यांच्या कार्यालयातून फोन आल्यानंतर राज ठाकरेंना ती पोस्ट डिलीट करावी लागली. सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यासाठी 500 रुपये मिळतात हे मला माहीत होते, पण पोस्ट डिलीट करण्यासाठी सुद्धा वेगळे पैसे मिळतात, हे त्यांच्यामार्फत समजले, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केला आहे. वाचा सविस्तर