Headlines

बनावट देवस्थान संकेतस्थळावरून भाविकाची फसवणूक:11 लाख 23 हजार रुपये काढले; लाईफ सर्टिफिकेटच्या नावाने ज्येष्ठाची 13 लाखांची फसवणूक




पुण्यात बनावट देवस्थान संकेतस्थळाच्या माध्यमातून एका भाविकाची ११ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणी लोहगाव पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका महिलेने लोहगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ती पती आणि कुटुंबासह दिवाळीच्या सुट्टीत मध्य प्रदेशातील एका प्रसिद्ध देवस्थानात दर्शनासाठी जाणार होती. यासाठी त्यांनी देवस्थानच्या संकेतस्थळांची पाहणी केली. महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध देवस्थानच्या संकेतस्थळावर विनामूल्य निवासासाठी नावनोंदणी करताना चोरट्यांनी महिलेच्या मोबाइलवर संपर्क साधला. नोंदणीसाठी शुल्क भरावे लागेल, असे सांगून त्यांनी बँक खात्याची माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करून चोरट्यांनी खात्यातून ११ लाख २३ हजार रुपये काढले आणि दुसऱ्या खात्यात वळवले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दिली. तपासात देवस्थानच्या नावाने बनावट संकेतस्थळ तयार केल्याचे समोर आले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राकेश कदम तपास करत आहेत. दुसऱ्या प्रकरणात, बँकेकडून लाईफ सर्टिफिकेट देण्याच्या नावाखाली एका ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची १३ लाख रुपयांची फसवणूक झाली. ते हडपसरमधील काळेपडळ परिसरात राहतात. त्यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. २६ ऑक्टोबर रोजी चोरट्यांनी त्यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला. राष्ट्रीयकृत बँकेचे प्रतिनिधी असल्याचे सांगून लाईफ सर्टिफिकेट देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांनी ज्येष्ठ नागरिकाला एपीके फाईल पाठवली. चोरट्यांनी बँकेच्या नावाने बनावट ॲप तयार केले आणि त्यातून खात्याची माहिती मिळवली. या माहितीचा गैरवापर करून खात्यातून १३ लाख रुपये काढले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *