![]()
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांना टाळून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ६ ज्येष्ठ नेत्यांनी सोमवारी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतल्याने राष्ट्रवादीत एकच संशयकल्लोळ उडाला. अजित पवारांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फ
.
मात्र, पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगितले की, राष्ट्रवादीच्या नेत्यांना शहा यांच्या भेटीची वेळ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीच मिळवून दिली होती. अजित पवारांच्या काळातील प्रलंबित विकासकामे, मतदारसंघातील निधी आणि महायुतीतील समन्वयासाठीच ही भेट होती, असे त्यांनी सांगितले.
या भेटीवेळी प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ व धनंजय मुंडे सहभागी झाले होते. मुंबई अध्यक्ष, युवक व युवती प्रदेशाध्यक्ष अशा महत्त्वाच्या नियुक्त्या पार्थ पवार करत असल्याने ज्येष्ठ नेत्यांत अस्वस्थता आहे.
पक्षावर नियंत्रणाचा प्रयत्न
पार्थ पवारांचा वाढता प्रभाव कमी करून अर्थखाते परत मिळवण्यासाठी दबावगट निर्माण करण्याचा ज्येष्ठ नेत्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी शहा यांच्याकडून पाठबळ मिळावे, असा त्यांचा प्रयत्न दिसतो. सुनेत्रा पवारांकडे नेतृत्व असले तरी संघटनेवर जुन्या निष्ठावंतांची पकड कायम असून अधिकारांवरून अंतर्गत संघर्ष सुरू आहे. या भेटीतून अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे.