![]()
चौंढाळा येथील श्री रेणुकादेवी-शरद साखर कारखान्यात ऊसदरावरून कारखाना प्रशासन आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये निर्माण झालेला संघर्ष टोकाला पोहोचला आहे. ऊसाला प्रतिटन ३ हजार ५०० पहिली उचलच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी ११ वाजता आंदोलन केले. संचालक मंडळासोबत चर्चा निष्फळ ठरल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गव्हाणीत ठाण मांडल्याने प्रशासनाने कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतला. कारखान्याचे व्हा. चेअरमन नंदू पठाडे यांनी सांगितले की, पाण्याची पातळी खालावल्याने वाळत चाललेला ७-८ महिन्यांचा अपरिपक्व ऊस गाळपासाठी येत आहे. या उसाचा साखर उतारा अत्यल्प असल्याने सध्या ३,५०० रुपये दर देणे शक्य नाही. माऊली मुळे म्हणाले, २७ ऑक्टोबरला निवेदन दिले तरी कारखाना सुरू ठेवण्यात आला.
Source link
कारखान्याच्या गव्हाणीमध्ये शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आंदोलन:श्री रेणुकादेवी-शरद कारखान्यावर उसाला प्रतिटन 3500 रुपयांची मागणी