Headlines

तळेगाव रोहीत 5.50 कोटींच्या‎प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन:दशक्रिया विधी शेड, बुद्धविहाराचे भूमिपूजन; तलाठी कार्यालयाचे लोकार्पण



तालुक्यातील तळेगाव रोही येथे ५ कोटी ५० लाख रुपये खर्चाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. यासह विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना शहराच्या धर्तीवर दर्जेदार आरोग्य सुविधा,

.

आमदार डॉ. आहेर म्हणाले की, तळेगाव रोही येथे उभारण्यात येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीमुळे परिसरातील नागरिकांना तातडीच्या आणि दर्जेदार आरोग्य सुविधा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होतील. तसेच विविध विकासकामांमुळे गावातील पायाभूत सुविधांचा विस्तार होऊन सामाजिक विकासालाही चालना मिळेल. यावेळी आमदार डॉ. आहेर यांच्या हस्ते ५ कोटी ५० लाख रुपये खर्चाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच जनसुविधा योजनेंतर्गत १५ लाख रुपये खर्चाच्या दशक्रिया विधी शेडचे बांधकाम, २० लाख रुपये खर्चाच्या बुद्धविहार बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. याशिवाय २० लाख रुपये खर्चाच्या नवीन तलाठी कार्यालयाच्या इमारतीचे लोकार्पण आणि तळेगाव रोही विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या नूतन इमारतींचे उद्घाटन करण्यात आले. या विकासकामांमुळे गावातील आरोग्य, सामाजिक आणि प्रशासकीय सुविधांना बळकटी मिळणार आहे.

या कार्यक्रमास माजी आमदार शिरीष कोतवाल, उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, भाजप तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, माजी सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, भाजप महिला आघाडी अध्यक्षा गीता झाल्टे, पंढरीनाथ खताळ, डॉ. राजेंद्र दवंडे, देविदास आहेर आदींसह ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *