Headlines

वकील संघात ॲड. गुंजाळांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब:निफाड वकील संघाच्या प्रमुख पदांची निवड अविरोध, तीन जागांसाठी झाली चुरशीची लढत



निफाड वकील संघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी अॅड. किरण गुंजाळ, तर उपाध्यक्षपदी अॅड. तुषार भानुवंशे यांची अविरोध निवड झाली. प्रमुख पदांसह अनेक पदांवर अविरोध निवड झाली असली, तरी वाचनालय प्रतिनिधी, महिला सचिव आणि पुरुष सदस्यांच्या दोन जागांसाठी

.

निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. नरेंद्र राणा, सहाय्यक निवडणूक अधिकारी अॅड. राजेंद्र हांडगे आणि अॅड. विजय माठा यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. अध्यक्षपदासाठी अॅड. किरण गुंजाळ, उपाध्यक्षपदासाठी अॅड. तुषार भानुवंशे, महिला उपाध्यक्षपदासाठी अॅड. विजया जगताप, सचिवपदासाठी अॅड. तुकाराम जाधव, खजिनदारपदासाठी अॅड. वैभव पानगव्हाणे, दहा वर्षांच्या आतील सदस्यपदासाठी अॅड. प्रथमेश कुलकर्णी आणि महिला सदस्यपदासाठी अॅड. रेखा सुरासे यांची यापूर्वीच अविरोध निवड झाली होती.

वाचनालय प्रतिनिधीच्या एका जागेसाठी अॅड. श्रीकांत वल्टे आणि अॅड. लक्ष्मण वाघ यांच्यात लढत झाली. यात अॅड. श्रीकांत वल्टे यांना १२३, तर अॅड. लक्ष्मण वाघ यांना १२० मते मिळाली. महिला सचिवपदाच्या निवडणुकीत अॅड. निर्मला अरिंगळे यांना १६१, तर अॅड. अफरोज शेख यांना ८३ मते मिळाली. पुरुष सदस्यांच्या दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अॅड. रवींद्र घोटेकर यांना १४८, अॅड. अमोल सानप यांना १३२, अॅड. प्रफुल्ल गवळे यांना ९९, तर अॅड. दिलीप शिंदे यांना ५६ मते मिळाली. या निवडणुकीत अॅड. रवींद्र घोटेकर आणि अॅड. अमोल सानप विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. नरेंद्र राणा यांनी निकाल जाहीर केला.

लक्षवेधी ठरली तीन मतांची लढत वाचनालय प्रतिनिधीच्या एका जागेसाठी अॅड. श्रीकांत वल्टे आणि अॅड. लक्ष्मण वाघ यांच्यात झालेली लढत विशेष लक्षवेधी ठरली. अॅड. लक्ष्मण वाघ यांच्या विरोधात अनेक मातब्बरांनी एकत्र येत प्रचार केला; तर युवा वकील अॅड. वाघ यांनी स्वतःच प्रचाराची धुरा सांभाळत त्यांना चुरशीची लढत दिली. त्यांना १२० मते मिळाली, तर विजयी उमेदवार अॅड. श्रीकांत वल्टे यांना १२३ मते मिळाली. अवघ्या तीन मतांनी झालेला पराभव निफाड वकील संघाच्या निवडणुकीत चर्चेचा विषय ठरला.

वकिलांचे हित जोपासणार ^निफाड वकील संघाच्या सर्व वरिष्ठ व कनिष्ठ सभासदांनी एकमताने माझ्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी सर्व पदाधिकारी आणि ज्येष्ठांच्या सहकार्याने पार पाडेन. वकिलांचे हक्क आणि हित काटेकोरपणे प्रयत्न करेन. – अॅड. किरण गुंजाळ, अध्यक्ष, निफाड वकील संघ



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *