Headlines

माझ्याकडे चार नाही, अनेक ऑडिओ क्लिप्स:वेळ आल्यावर आणखी बॉम्ब फोडणार, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला थेट इशारा




मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता राज्य सरकार आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांना थेट आणि इशारा दिला आहे. “माझ्याकडे फक्त चार ऑडिओ क्लिप्स नाहीत, तर अशा अनेक क्लिप्स आहेत. जर सरकारने आमच्याविरोधात सुरू असलेले हे षडयंत्र थांबवले नाही, तर मी लवकरच आणखी काही ऑडिओ बॉम्ब फोडणार आहे,” असा खळबळजनक इशारा जरांगे यांनी दिला आहे. नेमका प्रकार काय? गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध करणारे काही मराठा समाजातीलच चेहरे समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी गंभीर आरोप केला आहे की, हे सर्व राज्य सरकारचे आणि त्यातही प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांचे षडयंत्र आहे. “पैसे देऊन आमचेच मराठा कार्यकर्ते, मराठा समाजाच्या महिला यांना फोडण्याचे आणि आमच्याच मागे लावण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात आहे,” असा थेट आणि गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे. मनोज जरांगे काय म्हणाले? जरांगे म्हणाले, माझ्याकडे चार ऑडिओ क्लिप्स नाहीत, खूप आहेत. जर एकनाथ शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी हे षडयंत्र बंद नाही केले, पैसे देऊन आमच्याच समाजाचे लोक आणि महिला फोडण्याचे काम थांबवले नाही, तर काही महिन्यांनंतर आणखीन बॉम्ब पडणार आहेत.” २०२९ चे टार्गेट काय? या संवादातून मनोज जरांगे यांनी केवळ सध्याच्या आंदोलनावरच भाष्य केले नाही, तर आगामी राजकीय परिस्थिती आणि निवडणुकांवरही आपली नजर असल्याचे स्पष्ट केले आहे. “२०२९ च्या निवडणुकांमध्ये मला काही विशिष्ट लोकांची जिरवायची आहे,” असे जरांगे यांनी स्पष्ट सांगितल्याने, त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे, याची आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. जरांगे पाटील एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. आपले पुरे प्रमाणपत्र थांबवलेत सरकारनं दरम्यान, कालही जरांगेंनी पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यामध्ये ते म्हणाले, मराठ्यांना मला हे सांगायचे आहे की तुम्ही पटवून घ्या आता, या गोष्टीची मानसिकता तयार करा. आपले पुरे प्रमाणपत्र थांबवलेत सरकारनं. बोलायचं नाही का? नोंदी थांबवल्यात सगळ्या. शोध मोहीम सगळी थांबवली. आपण 93 लाख नोंदी अभ्यासक दिलेत त्यांना. नाही शोध सुरू. हैदराबाद, सातारा देणार नाहीयेत. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या लोकांनी जागे कधी होणार आहात तुम्ही? तुमचं हक्कात असून तुम्हाला देत नाहीत म्हटल्याच्यानंतर हे सरकार किती मोठा गेम करायलाय. तरी तुम्हाला नेत्यावरच प्रेम करायचंय का? कधीतरी सत्यावर प्रेम करा. महिलांची टोळी बनवलीये माझ्या विरोधात मनोज जरांगे म्हणाले, मी खूप मेहनत केली याच्यात, मी खूप कष्ट केलेत. मग तुम्ही खरवडून कधी जागे होणार? गरीब आहोत आपण याचा अर्थ आपल्या मनगटात ताकद नाही असं थोडंच आहे? बघू आपण, जो सामना करायचा तो वेळ येईल ते करू. पण यांना पण अंदाजा नाहीये, मी किती लांब हात टाकू शकतो. तुम्ही जितकं जितकं मराठ्याला त्रास देणार, तुम्ही जितक्या टोळ्या बनवणार, आता परवा आणखी एक बोलवलीये बुधवारी. महिला महिलांची. त्याच्यात देवेंद्र फडणवीसांचा ओएसडी आहे, असा दावा जरांगे यांनी केला आहे. सविस्तर वाचा —————– हेही वाचा.. संविधान बदलण्याचे काँग्रेसचे षडयंत्र: CM फडणवीस म्हणाले- उद्धव ठाकरेंनाही रेजिम चेंज हवे, पण रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत होऊ देणार नाही!
देशाचे संविधान आणि लोकशाही व्यवस्था वाचवण्यासाठी आज आम्ही मैदानात उतरलो आहोत. देशामध्ये पुन्हा एकदा संविधान बदलण्याचे आणि संविधानाने निर्माण केलेली लोकशाही व्यवस्था संपवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. काँग्रेस पक्ष आणि त्यांच्याशी संबंधित घटक एका आंतरराष्ट्रीय षडयंत्राअंतर्गत हे प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ मोर्चातून ते बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत लढण्याचा निर्धार व्यक्त केला. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *