![]()
राज्यातील सहकार क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सातारा, सांगली आणि अहिल्यानगर या तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकीची मतमोजणी आज मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाली आहे. पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर, पहिल्याच तासात सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतून मोठी बातमी समोर आली आहे. साताऱ्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी दणदणीत विजय मिळवला आहे, तर दुसरीकडे जावळीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाने शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. पाटणमध्ये शंभूराज देसाईंची सरशी; भाजपला धक्का सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पाटण सोसायटी मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. येथे शंभूराज देसाई आणि त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी भाजपचे सत्यजितसिंह पाटणकर यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. दोन्ही गटांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. मात्र, मतमोजणीच्या पहिल्याच तासात शंभूराज देसाई यांनी बाजी मारल्याचे स्पष्ट झाले. पाटणमधील जागेसाठी असलेल्या एकूण १०३ ठरावांपैकी तब्बल ५८ ठराव आपल्या बाजूने वळवण्यात शंभूराज देसाई यांना यश आले आहे. सत्यजितसिंह पाटणकर यांचा झालेला हा पराभव भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे, शंभूराज देसाई यांच्या या विजयात त्यांचे सुपुत्र यशराज देसाई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ठराव एकत्र करण्याच्या प्रक्रियेत त्यांचे नियोजन अचूक ठरले. या विजयामुळे सातारा जिल्हा बँकेसह पाटणच्या राजकारणातही शंभूराज देसाई आणि शिंदे गटाचा दबदबा आणखी वाढला आहे. जावळीत शशिकांत शिंदेंना धक्का; शिवेंद्रराजेंची बाजी पाटण पाठोपाठ जावळी सोसायटी गटातूनही मोठा निकाल समोर आला आहे. येथे राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाने मोठी बाजी मारली आहे. शिवेंद्रराजेंचे कट्टर समर्थक ज्ञानेश्वर (ज्ञानदेव) रांजणे यांनी जावळी सोसायटीतून दणदणीत विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे समर्थक विठ्ठल गोळे यांचा दारुण पराभव केला. हा निकाल शशिकांत शिंदे आणि पर्यायाने महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या प्रमुख निकालांसोबतच या निवडणुकीत संचालक पदासाठी रूपाली राजापुरे यांनीही विजय संपादन केला आहे. सातारा जिल्हा बँकेच्या मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ————— हेही वाचा.. गोकुळचा सत्तासंघर्ष कोर्टात: 10 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता अध्यक्ष निवडीची सभा घेण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश; सर्व संचालकांना नोटीस
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या अध्यक्ष निवडीचा तिढा अखेर न्यायालयाच्या उंबरठ्यावर पोहोचला असून मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने याप्रकरणी महत्त्वपूर्ण अंतरिम आदेश दिले आहेत. गोकुळच्या नव्या अध्यक्षांच्या निवडीसाठी येत्या 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता विशेष सभा आयोजित करण्याचे स्पष्ट निर्देश न्यायालयाने निवडणूक प्राधिकरणाला दिले आहेत. याचसोबत आज 2 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्व 25 नवनिर्वाचित संचालकांना या सभेची रीतसर नोटीस बजावण्यात यावी, असा आदेशही न्यायमूर्ती अभय आहुजा आणि न्यायमूर्ती धीरज धोटे यांच्या खंडपीठाने दिला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला स्पष्ट बहुमत मिळूनही महायुतीच्या संचालकांनी बहिष्कार टाकल्याने अध्यक्ष निवडीची सभा कोरमअभावी तहकूब झाली होती. याविरोधात समविचारी आघाडीच्या संचालकांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सविस्तर वाचा
Source link