Headlines

कौटुंबिक नात्यातील क्लिष्टता मानस शास्त्रीय दृष्टिकोनातून सोडवण्याचे धडे:मिलिंद आपटे, देशपांडे , रानडे यांचे सादरीकरण




कस्तुरी चॅरिटेबल सोसायटी व वै. सौ. सुनंदाताई शांताराम बुटे वारकरी शिक्षण विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कस्तुरी व्याख्यानमालेचा समारोप झाला. अखेरच्या दिवशी विवेक व भावनांचा अनोखा मेळ असणारा “मनाचिये द्वारी” हा प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न झाला. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून नातेसंबंधातील व कौटुंबिक नात्यातील क्लिष्टता कशी सोडवायची याचे सादरीकरण नागपूर येथील मिलिंद आपटे, मिलिंद देशपांडे व अकोल्याच्या ऋजुता रानडे यांनी केले. माणसाच्या आयुष्यात तारुण्य ते वृद्धापकाळादरम्यान येणाऱ्या विविध प्रसंगांचे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सुंदर विवेचन या कार्यक्रमातून करण्यात आले. प्रेमविवाह झालेल्या तरुण-तरुणीदरम्यान लग्नापूर्वी चांगला सुसंवाद राहतो. मात्र लग्न झाल्यानंतर त्यांच्यात गैरसमज निर्माण होतात. समुपदेशनात्मक कथन, प्रासंगिक कविता व भावगीतांनी युक्त असा हा आगळावेगळा कार्यक्रम होता. व्यवस्थापनक्षेत्र, मानसशास्त्र व चित्रपट क्षेत्रातही भरीव योगदान असलेले डॉ. मिलिंद आपटे, कवी श्री मिलिंद देशपांडे व सौ. ऋजुता रानडे यांनी अत्यंत उत्कृष्ट व भावपूर्ण कार्यक्रम सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले… या कार्यक्रमाची संकल्पना श्री मिलिंद देशपांडे यांची असून निर्मिती शिरीष वैद्य व अविनाश आचार्य यांची आहे. कस्तुरी व्याख्यानमालेच्या समारोपीय व्याख्यानाच्या निमित्ताने झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर कस्तुरीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. किशोर बुटोले, कर्मयोग परिवाराचे प्रा. डॉ. शांताराम बुटे, तसेच “मनाचिये द्वारी” या कार्यक्रमाचे सहभागी कलावंत मिलिंद आपटे, मिलिंद देशपांडे व ऋजुता रानडे होते.. कस्तुरीचे स्नेही व स्थानिक शिवाजी महाविद्यालयातून निवृत्त झालेले प्रा. प्रभाकर पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांनी सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन केले.. याप्रसंगी व्यासपीठावरील मान्यवरांचे कस्तुरीचे सदस्य अमर शर्मा यांनी पुष्प देऊन स्वागत केले. “मनाचिये द्वारी” या कार्यक्रमात सहभागी कलावंतांचा प्रा. प्रभाकर पाटील, डॉ. शांताराम बुटे व मीरा देशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन ह.भ.प. संगीता जोध यांनी केले. आभार राजेश्वर पेठकर यांनी मानले. कार्यक्रमात पद्म प्रतिष्ठान, नागपूर व राष्ट्रसंत तुकडोजी आध्यात्मिक गुरुकुल, मोझरीद्वारा कस्तुरीचे कार्यकारिणी सदस्य श्री संजय गायकवाड यांना ”मानद आचार्य” ही पदवी प्रदान करण्यात आली. त्या प्रित्यर्थ त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.. पाहुण्यांचा परिचय संजय गायकवाड यांनी केला. कार्यक्रमाची सांगता ऋजुता रानडे यांच्या पसायदानाने झाली.. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संजय ठाकरे, संजय गायकवाड, राजेश्वर पेठकर, अमर शर्मा, संजय बुटोले, अनिता इधोळ, सौ. करुणा बुटे, चेतना आनंदानी, अपर्णा काळे, ज्योती सुलताने व संगीता जोध यांनी अथक परिश्रम घेतले. यामुळे हा सोहळा उत्साहात पार पडला. विवाह व्यवस्था मजबूत करणे आवश्यक मुलांच्या जन्मापासूनच त्यांच्या बालमनावर उत्तम संस्कार करून योग्य पिढी घडवण्याचे काम आई-वडिलांचे असते मात्र संस्कार देण्याच्या काळातच जर आई-वडिलांमध्ये वाद होत असतील तर मुलांवर संस्काराचा अभाव होईल व मुलं दडपणाखाली जाऊन विविध समस्या निर्माण होतील. कुटुंब संस्था जपण्यासाठी व अधिक बळकट करण्यासाठी विवाह नंतर स्त्री पुरुषांच्या सहजीवनातील विविध संवेदनशील विषयांना हात घालून लग्न व्यवस्था मजबूत करण्याच्या सामाजिक जाणिवेतून कस्तुरी या सामाजिक संस्थेने या सामाजिक विषयावर प्रबोधन व्हावे या उद्देशाने ” मनाचिये द्वारी” या कार्यक्रमाचे आयोजन केले होते ..संसार करताना विवेक व भावना यांची सांगड घालून सहजीवन कसे जगावे, याचेही समुपदेशन या कार्यक्रमातून करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *