Headlines

Aditya Thackeray Slams Maharashtra Govt Over Drought, Pollution & Criticism


एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात भीषण दुष्काळाचे सावट आहे, तर दुसरीकडे मुंबई आणि पुण्यासारख्या प्रमुख शहरांमध्ये प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. प्रदूषण कोणत्याही एका जाती किंवा धर्मापुरते मर्यादित नसून त्याचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागतो. या पार्श्व

.

आदित्य ठाकरे म्हणाले की, सत्ताधारी पक्ष प्रश्न विचारणाऱ्यांना थेट देशद्रोही ठरवतो. जे लोक पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे येतात किंवा प्रश्न उपस्थित करतात, त्यांना ‘दिमागी नक्षल’ किंवा ‘अर्बन नक्षल’ म्हणून हिणवले जाते. अभिनेत्री दिया मिर्झा यांनी पर्यावरणाबाबत दिलेल्या संदेशावर केवळ त्यांच्या आडनावावरून टीका करण्यात आली. या प्रकरणी उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर आम्ही जात किंवा धर्म पाहून बोललो नाही असा बचाव भाजप नेत्यांनी केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मुंबई मनपाचे पत्र मी वाचले

आदित्य ठाकरे म्हणाले की, अभिनेत्री दिया मिर्झा आणि माधुरी दीक्षित यांनी जनजागृतीसाठी तयार केलेल्या व्हिडिओंचा संदर्भातील मुंबई महानगरपालिकेने पाठवलेले पत्र मी स्वतः वाचले आहे. त्यात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फटाके न फोडण्याचे आवाहन करणारे व्हिडिओ तयार करायचे आहेत, असा स्पष्ट उल्लेख आहे.

सरकार भव्य कार्यक्रमांच्या आयोजनात व्यस्त

आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहोत. सरकारने जाहीर केलेली अवघी पाच हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांसाठी पुरेशी आहे का? शासकीय कार्यक्रमांवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे, परंतु अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांपर्यंत योग्य ती मदत पोहोचत नाही. लोकांना प्यायला पाणी नसताना सरकार मात्र भव्य कार्यक्रमांच्या आयोजनात व्यस्त आहे.

शेतकरी कर्जमाफीचे पुढे काय झाले?

आदित्य ठाकरे म्हणाले की, शेतकऱ्यांना खऱ्या आधाराची गरज असताना सरकार मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे. मुख्यमंत्री विमानातून फिरतात, त्यांना जमिनीवरची परिस्थिती कशी कळणार? शेतकऱ्यांचे हाल सरकारला दिसत नाहीत का? शेतमालाला हमीभाव कोण देणार? गेल्या वर्षीचे आणि या वर्षीचे पिकांच्या नुकसानीचे विम्याचे पैसे अजूनही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. तसेच सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचे पुढे काय झाले? जनतेमध्ये संवेदनशीलता शिल्लक आहे, परंतु सरकारमध्ये ती कुठेही दिसून येत नाही, असा टोला लगावत आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले की, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आम्ही आमचे सर्व मोठे कार्यक्रम रद्द केले असून यंदाची दिवाळी अतिशय साधेपणाने साजरी करणार आहोत.

हे ही वृत्त वाचा

शिंदेंच्या शिवसेनेत 3 एकनाथ शिंदे निर्माण झालेत, दोघांचा आम्हालाही संपर्क:संजय राऊतांचा गौप्यस्फोट, गोकुळ व बच्चन यांच्या सुरक्षेवरून सरकारवर घणाघात

राज्यातील महायुती सरकार आणि विशेषतः भाजपवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत चौफेर हल्ला चढवला. गोकुळ दूध संघाची निवडणूक, दिया मिर्झाचे फटाक्यांवरील वक्तव्य, महानायक अमिताभ बच्चन यांची सुरक्षा ते महायुतीतील अंतर्गत वाद अशा सर्वच मुद्द्यांवर राऊत यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दांत सरकारचा समाचार घेतला. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सध्या तीन गट निर्माण झाले असून, त्यातील दोन नेत्यांनी आम्हाला संपर्क केल्याचा खळबळजनक राजकीय गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.