Headlines

Mumbra Corporator Sahar Sheikh Aurangzeb Post Controversy; Thane News


ठाण्यातील मुंब्रामधील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांनी मुघल सम्राट औरंगजेबाचे कौतुक करणारी एक सोशल मीडिया पोस्ट त्यांनी शेअर केल्यामुळे त्यांच्याविरोधात सर्वत्र संताप व्यक्त होत असून त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. सहर शेख

.

सहर शेख म्हणाल्या की, मुघल सम्राट औरंगजेबाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी, एक असा सम्राट ज्याने पूर्ण श्रद्धेने आणि शक्तीने मलिक उल हिंदवर राज्य केले. परंतु लक्षात ठेवा, इतिहास कधीही पुसता येत नाही, असे म्हटले आहे.

पुस्तकांमधून मुघलांना बाहेर काढू शकता

सहर शेख म्हणाल्या की, मागे हुमायूनची कबर आहे. कधी विचार केला आहे का, की कबर अशी बांधत असतील, तर ते देश कसा चालवत असतील? असा सवाल उपस्थित केला आहे. तर मुघलांनी ताजमहाल बांधला आणि जगातल्या सात आश्चर्यांमध्ये त्याचा समावेश झाला, असे नमूद केले आहे. गंमत काय माहीत आहे का? त्यांना इतिहासातून मुघलांना बाहेर काढायचे आहे. तुम्ही पुस्तकांमधून मुघलांना बाहेर काढू शकता, पण या जमिनीवरून कसे बाहेर काढाल? असा सवाल त्यांनी पोस्टमध्ये केला आहे. तसेच ‘इन्शाअल्लाह मुघलिया सल्तनत का इकबाल हमेशा बुलंद रहे’ असेही म्हटले आहे. या पोस्टमुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

हे ही वृत्त वाचा

टोरंटकडून फंड घेणारे राजकीय पक्ष टोरंटसोबत की सह्याद्री वाचवणाऱ्यांसोबत?:प्रकाश आंबेडकरांचा सवाल, म्हणाले- भाजपला 137 तर काँग्रेसला 22 कोटी मिळाले

टोरंट कंपनीचा आयपीएलशी संबंध आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या मुलाशीही याचा संबंध आहे. टोरंट प्रकल्पाला विरोध करणारे राजकीय पक्षाचे नेत्याच्या पक्षाला कंपनीने राजकीय डोनेशन दिले आहे,राजकीय पक्ष टोरंट ग्रुपसोबत उभे राहणार की सह्याद्री बचावासाठी लढणाऱ्या लोकांसोबत उभे राहणार? याचा खुलासा या पक्षांनी करावा, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.