![]()
पुण्यातील कोथरूडमध्ये भरधाव दुचाकीच्या धडकेत पारस सुधीर बोत्रे (वय २८) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दुचाकीस्वार आर्यन गौरव कऱ्हाडकर (वय १८) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोत्रे हे नवी पेठेतील श्री शिवछत्रपती सोसायटीत राहत होते. कऱ्हाडकर कुंबरे हर्मिटेज, डीपी रस्ता, कोथरूड येथे राहतो. पोलीस उपनिरीक्षक कल्पना मेडाबलमेवार यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोत्रे गेल्या महिन्यात कोथरूड परिसरातून जात होते. बाह्यवळण मार्गावर वळत असताना समोरून आलेल्या भरधाव दुचाकीने त्यांना धडक दिली. ते गंभीर जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक एन. मेडाबलमेवार तपास करत आहेत. बसचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने प्रवासी महिला जखमी पुणे-सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गात पीएमपी बसचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने प्रवासी महिला जखमी झाली. या प्रकरणी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वामी विवेकानंद सोसायटी, कात्रज येथे राहणाऱ्या ज्योती मयूर दिघे (वय ३६) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड ते बिबवेवाडी मार्गावरील पीएमपी बस सोमवारी दुपारी पुणे-सातारा रस्त्याने जात होती. बसमध्ये ३० ते ३५ प्रवासी होते. के. के. मार्केट परिसरातील बीआरटी मार्गातून एक महिला समोर आली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे बसमधील चार ते पाच प्रवाशांना दुखापत झाली. ब्रेक दाबल्याने ज्योती दिघे यांचा चेहरा लोखंडी गजावर आपटला आणि त्यांचे पाच दात तुटले. दात ओठात शिरल्याने दुखापत झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार एन. राऊत तपास करत आहेत. ————– हेही वाचा.. चार राज्यांत तपास करून घरफोडीतील दोघांना अटक:गाझियाबादमधून रजिया सुलतान टोळीतील आरोपी पकडले; सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल जप्त
दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथे तपास करून विश्रामबाग पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यातील दोघांना गाझियाबाद येथून अटक केली. हे दोघे रजिया सुलतान टोळीतील असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्यांच्याकडून सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. सविस्तर वाचा
Source link