Headlines

सौरऊर्जेच्या तंत्रज्ञानातून युवकांना रोजगाराची नवी संधी:विद्यार्थ्यांना सौरऊर्जा यंत्रणेचे महत्त्व, कार्यपद्धती अन् रोजगाराच्या संधींबाबत केले मार्गदर्शन



वाढत्या वीजबिलावर सौरऊर्जा हा केवळ बचतीचा पर्याय नसून युवकांसाठी रोजगारनिर्मितीचे नवे क्षेत्र ठरत आहे. या क्षेत्रातील तांत्रिक कौशल्य आत्मसात केल्यास स्वतःच्या पायावर उभे राहण्याची मोठी संधी उपलब्ध होऊ शकते, असे प्रतिपादन उद्योजक अमोल जवणे यांनी केले

.

मिटकॉनच्या विद्यार्थ्यांना घरगुती सौरऊर्जा यंत्रणेचे महत्त्व, कार्यपद्धती आणि रोजगाराच्या संधी याविषयी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

ते म्हणाले, पारंपरिक ऊर्जास्रोतांवरील वाढता ताण आणि विजेच्या वाढत्या खर्चामुळे सौरऊर्जेचे महत्त्व अधोरेखित होत आहे. सूर्यप्रकाशातून वीजनिर्मिती करून घरगुती वीजखर्चात बचत करता येते. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागतो. त्यामुळे सौरऊर्जा ही काळाची गरज बनली आहे.

यावेळी त्यांनी सोलर पॅनेलची निवड, आवश्यक साहित्य, पॅनेल बसविण्याची पद्धत, यंत्रणेची कार्यप्रणाली, देखभाल आणि आर्थिक फायदे यांची माहिती दिली. सौरऊर्जेचा वाढता वापर लक्षात घेता या क्षेत्रातील प्रशिक्षित तंत्रज्ञांची गरजही वाढणार असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमप्रसंगी गायकवाड सर, सुतार सर, मुस्कान सय्यद आणि मिटकॉनचे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *