Headlines

'…नाहीतर दादांच्या कोथरूडमध्ये जाऊनच फॉर्म टाकतो':गोकुळच्या संघर्ष मोर्चातून विवेकानंद पाटलांचे चंद्रकांत पाटलांना निवडणुकीचे खुले आव्हान




कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून सध्या जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संचालक मंडळाच्या 25 पैकी समविचारी आघाडीला 13 तर महायुतीला 12 जागा मिळाल्या आहेत. मात्र, अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक असलेले संख्याबळ आपल्याकडे खेचून आणण्यासाठी महायुती सरकारने संचालक मंडळावर 5 शासन नियुक्त संचालक नेमण्याचा आणि त्यापैकी तब्बल चौघांना मतदानाचा अधिकार देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवण्यासाठी आज कोल्हापुरात दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विराट ‘संघर्ष मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चादरम्यान झालेल्या जाहीर सभेत विवेकानंद पाटील यांनी अत्यंत आक्रमक आणि घणाघाती भाषण केले. आपल्या भाषणातून त्यांनी सरकारच्या या निर्णयावर सडकून टीका केली आणि थेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनाच उघड आव्हान दिल्याने कोल्हापूरचे राजकारण आणखीनच ढवळून निघाले आहे. नाहीतर दादांच्या कोथरूडमध्ये जाऊनच फॉर्म टाकतो.. चंद्रकांत पाटलांचे नाव न घेत त्यांच्यावर विवेकानंद पाटील यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, मागच्या काही दिवसांपासून अमूल अमूलचे फार नाव ऐकत आहे. एक नेता बघितला ते सुद्धा अमूलचेच चॉकलेट देत होता. का दुसरं भेटलं नाही का? ते मला माहीत आहेत ते कुठले आहेत. त्यांना माझे खुले चॅलेंज आहे. कोल्हापूरमधून कुठल्या पण विधानसभेतून दादांनी फॉर्म भरावा, मी अपक्ष उभा राहील. नाहीतर दादांच्या कोथरूडमध्ये जाऊनच फॉर्म टाकतो. पुरोगामी कोल्हापूरचा स्वाभिमान कागलकर पुढे बोलताना विवेकानंद पाटील म्हणाले, माझे दादांना इतकेच म्हणणे आहे की कोल्हापूरची जनता सुद्धा आपलीच आहे. त्यांच्यासोबत परक्या सारखे करू नका. इथे लिहिले आहे की पुरोगामी कोल्हापूरचा स्वाभिमान कागलकर. कागलकरांनो तुमचा पण स्वाभिमान जागा झाला पाहिजे, असे आवाहन पाटील यांनी यावेळी बोलताना केले. तज्ञ संचालक म्हणजे फुकटच्या म्हशीमागे रेडकू विवेकानंद पाटील म्हणाले की, तज्ञ संचालक म्हणजे फुकटच्या म्हशीमागे रेडकू. तुम्हाला विकास करायची लय खाज आहे तर राधानगरी धरणाची गळती काढा. मी कोणत्याही पक्षाचा नाही. मी फक्त शेतकऱ्याचा पोरगा म्हणून या मोर्चात आलो. लोकांनी आमदारांना एक नोट आणि एक व्होट देऊन दांडार निवडून दिले. पण ते काम करत नाहीत. सरकार सांगत आहे कोरम पूर्ण होत नाहीये. तुमचा कोरम 2029 लाच पूर्ण होईल, असा टोला पाटील यांनी लगावला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *