![]()
गावाच्या विकासासाठी केवळ निधीची वाट न पाहता ग्रामस्थांनी एकत्र येऊन काम केले, तर काय बदल घडू शकतो, याचे उदाहरण आर्वी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या मिर्झापूर (नेरी) गावाने घालून दिले आहे. पुनर्वसित गावातील अनेक अडचणी आणि मर्यादित आर्थिक परिस्थिती असतान
.
मशाल फेरीने झाली होती सुरुवात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून २०२५-२६ पासून राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू झाले. मिर्झापूरमध्ये १७ सप्टेंबर २०२५ रोजी मशाल फेरी काढून अभियानाला सुरुवात करण्यात आली. आठ घटकांवर आधारित विविध उपक्रम राबवताना सरपंच बाळा सोनटक्के यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला. तालुका, जिल्हा आणि विभागस्तरीय पथकांनी कामांची तपासणी केली. त्यानंतर विविध विभागांमधील आयुक्तांच्या समितीनेही ग्रामस्थांच्या कामाचे मूल्यमापन केले.